Author: Team GarjaMaharashtra

दिनांक :-१०-०९-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी लखनऊ:- ओबीसी, मागासवर्गीय व अति-पिछडा समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी नेते श्री.अनिल महाजन यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. केशव प्रसाद मौर्य यांची सदिच्छा भेट घेतली. या दौऱ्यात महाजन यांनी माळी, मौर्य, कुशवाह, सैनी आणि शाक्य समाजबांधवांच्याही भेटीगाठी घेतल्या. ही भेट पूर्णपणे बिगर राजकीय व सामाजिक स्वरूपाची असल्याचे सांगण्यात आले. या वेळी ओबीसी आरक्षण, कार्यकर्त्यांवर होणारे अन्याय आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः केंद्र सरकारने आगामी जनगणने मध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अशी शिफारस उत्तर प्रदेश सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली जावी, अशी…

Read More

दिनांक :-१०-०९-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,सांगली/खानापूर प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून मांजर्डे येथे कबड्डी मॅट व बस थांबा, तसेच नरसेवाडी येथे घोटी–नरसेवाडी–पेड–मोराळे रस्ता आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभा मंडप या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि नागरिकांसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमदार सुहास बाबर यांनी विशेष भर दिला आहे. त्यातूनच मांजर्डे येथे कबड्डी खेळाडूंसाठी मॅटची सुविधा उपलब्ध होत आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सरावासाठी चांगले व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना…

Read More

दिनांक ०८/०९/२०२६ गर्जा महाराष्ट्र न्यूज लखनऊ,प्रतिनिधि : उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ में माली, सैनी, कुशवाहा, मौर्य एवं समस्त ओबीसी समाज का विशाल ‘अति पिछड़ा महामेला’ बड़े ही उत्साह के साथ संपन्न हुआ। इस सम्मेलन में समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष एवं उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादव तथा मुंबई के प्रमुख ओबीसी नेता एवं महाराष्ट्र माली समाज महासंघ के प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। लगभग 5 से 10 हजार नागरिकों की विशाल उपस्थिति में आयोजित इस सम्मेलन में माली-सैनी समाज की विभिन्न उपजातियों के प्रतिनिधि और वरिष्ठ नेता बड़ी संख्या में शामिल…

Read More

दिनांक ०८/०९/२०२६,गर्जा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, लखनऊ:-उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे माळी, सैनी, कुशवाह, मौर्य आणि सर्व ओबीसी समाजाचा भव्य ‘अति मागासवर्गीय महामेळावा उत्साहात पार पडला. या संमेलनाला समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुंबईचे ओबीसी नेते तथा महाराष्ट्र माळी समाज महासंघ हाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुमारे ५ ते १० हजार नागरिकांच्या विक्रमी उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात माळी-सैनी समाजाच्या विविध पोटजातींचे प्रतिनिधी व दिग्गज नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनिल महाजन यांची महत्त्वपूर्ण मागणी व राजकीय चर्चा मेळाव्यातील आपल्या भाषणात आणि अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या वन-टू-वन चर्चेत अनिल…

Read More

दिनांक – ०१/०९/२०२६ ,गर्जा महाराष्ट्र न्यूज विशेष वृत्त: मागच्या वर्षी चारधाम यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, या वर्षी २०२६ मध्ये आई-वडिलांना नेपाळची आंतरराष्ट्रीय वारी घडवून काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचे सुखरूप दर्शन घडवण्याचे भाग्य लाभले, अशी भावना अनिल महाजन यांनी व्यक्त केली. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असून त्यांचा हा हसरा चेहरा असाच कायम राहावा, अशी प्रार्थना त्यांनी प्रभू चरणी केली आहे. अतिशय हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करून आई-वडिलांनी आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून मुलांना लहानाचे मोठे केले. स्वतःच्या सुखाचा त्याग करत, अगदी आईने स्वतः उपाशी राहून मुलांना वाढवले. आयुष्यात कधीही विमानात न बसलेल्या आणि आंतरराष्ट्रीय…

Read More

दिनांक – २९/०८/२०२६ ,गर्जा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:- नेपाळची राजधानी काठमांडू येथे ‘नेपाळ कुशवाह कल्याण समाज’च्या वतीने आयोजित लव-कुश जयंती सोहळ्यात माळी-कुशवाह समाजाच्या आंतरराष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माळी समाज महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांचा नेपाळमधील कुशवाह-माळी समाजाच्या वतीने गौरव करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र,नेपाळमधील पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अनिल महाजन यांनी स्वतःचा सत्कार स्वीकारण्यास नकार देत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. या कार्यक्रमाला नेपाळ कुशवाह कल्याण समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रमुख राष्ट्रीय पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातून गेलेले माळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन. आपल्या भाषणात अनिल महाजन यांनी नेपाळमधील पूरग्रस्तांच्या परिस्थितीबद्दल चिंता…

Read More

दिनांक :-२७-०८-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,मुंबई:- काठमांडू येथे पूरपरिस्थितीतही श्री.पशुपतिनाथ दर्शन सुलभ; नेपाळमधील कुशवाहा व माळी समाजाकडून विशेष आदरातिथ्य. नेपाळमधील पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ठीक ०८:०० वाजता काठमांडू येथील श्री.पशुपतिनाथ मंदिरात अत्यंत शांत, सुटसुटीत आणि शिस्तबद्ध वातावरणात सहकुटुंब भाविकांचे दर्शन संपन्न झाले. कोणतीही घाईगडबड न होता आई-वडिलांसह भगवान श्री.पशुपतिनाथांचे अत्यंत उत्तम रीतीने दर्शन घडले. नेपाळमधील या कठीण प्रसंगात माळी व कुशवाहा समाजाचे माजी मंत्री माननीय श्री.शत्रुघ्न सिंहजी, कुशवाहा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रमुख प्रदेश पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पूरपरिस्थिती असूनही सर्व भाविक पूर्णपणे सुरक्षित असून चिंतेचे कोणतेही कारण नाही. या वेळी कुशवाहा व माळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भाविकांचा विशेष सत्कार समारंभ…

Read More

दिनांक :- २४-०८-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज, मुंबई:-महाराष्ट्रातील वाढत्या पर्यावरणीय व वायू प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनावर न्यायालयाच्या स्तरावरून संबंधित हाय पॉवर कमिटीला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील वाढते वातावरणीय व पर्यावरणीय प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच पर्यावरण संवर्धनाच्या प्रश्नांवर मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून (Suo Motu) दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेअंतर्गत उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला सहकार्य करण्यासाठी ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार…

Read More

दिनांक :- २१-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,ठाणे:- ठाणे शहरात बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी जुगाराचे एक अत्यंत मोठे आणि धोकादायक रॅकेट सक्रिय झाले आहे. या ऑनलाईन लॉटरी जुगारामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.”गर्जा महाराष्ट्र न्यूज”चॅनेल’च्या गोपनीय टीमने ठाणे शहरात केलेल्या विशेष पाहणी व सर्वेदरम्यान परिमंडळ १ आणि परिमंडळ ५ च्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट उघडपणे चालवले जात असल्याचे समोर आले आहे. तपासातील प्रमुख मुद्दे व धक्कादायक बाबी: ठाणे शहरात मोठे रॅकेट सक्रिय: “गर्जा महाराष्ट्र न्यूज” ने विशेष लक्ष केंद्रित करून प्रथम ठाणे शहराचा आढावा घेतला असता, शहरात ऑनलाईन लॉटरी जुगाराचे अजस्र जाळ पसरल्याचे आणि एक मोठे रॅकेट उघडपणे कार्यरत असल्याचे निष्पन्न…

Read More

दिनांक :- १९-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,ठाणे:- ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील सर्वच्या सर्व पाचही उपायुक्त परिक्षेत्रात (१,२,३,४,५) परिमंडळ मध्ये बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. शहरातील कानाकोपऱ्यात उघडपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे दररोज कामगार,मजूर आणि गोरगरीब वर्ग भरडला जात असून अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त होत आहेत. रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि परिमंडळ निहाय जाळे ठाणे शहरात ऑनलाईन लॉटरीचे हे अवैध जाळे चालवण्यासाठी तीन मुख्य ऑपरेटर सक्रिय असल्याचे समोर येत आहे:- झोन १, झोन २ आणि झोन ५: या तिन्ही विभागांमध्ये ‘मोहम्मद’ नावाच्या व्यक्तीचे मोठे नेटवर्क कार्यरत असून त्याच्या माध्यमातून लॉटरीची अनेक बेकायदेशीर दुकाने थाटली गेली आहेत. झोन ३ आणि झोन…

Read More