दिनांक :०१/१०/२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,प्रतिनिधी भिवंडी:- मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार आणि ‘ठाणे टू’ म्हणून झपाट्याने विकसित होत असलेला भिवंडी बायपास परिसर सध्या गंभीर कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाने ग्रासला आहे. या भागात कोट्यवधी रुपयांचे गृहप्रकल्प उभे राहत असून मोठा निवासी परिसर तयार होत आहे. मात्र, याच महत्त्वाच्या बायपास परिसराला बेकायदेशीर लॉजिंग-बोर्डिंग आणि अनधिकृत डान्स बारचा मोठा विळखा पडला असून, याविरोधात मंत्रालय व विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री. अनिलभाऊ महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी ते ठाणे पोलीस आयुक्त, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे कडक कारवाईबाबत निवेदन सादर केले आहे .

मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार आणि लॉजिस्टिक हब धोक्यात.
भिवंडी बायपास हे अत्यंत महत्त्वाचे वाहतूक केंद्र (हब) आहे. आशियातील सर्वात मोठा निवासी परिसर असलेल्या ठाणे जिल्ह्यासह कल्याण, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, वाडा, मोखाडा आणि नाशिककडे जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. तसेच शिर्डीला जोडणारा ‘समृद्धी महामार्ग’ आणि देशातील मोठा लॉजिस्टिक हब याच बायपासला जोडलेला आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी बेकायदेशीर कृत्ये आणि गुन्हेगारी राजरोसपणे बहरत असल्याने संपूर्ण परिसराची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.

महिला आणि सुज्ञ नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर
या भागात अवैध वेश्या व्यवसाय व मानवी तस्करी: या भागात डायमंड लॉजिंग-बोर्डिंग, किनारा लॉज, संबा लॉजिंग बोर्डिंग, प्रवीण लॉजिंग आणि बोर्डिंग, श्री राज लॉजिंग बोर्डिंग, ओयो सॉलिटेअर रेसिडेन्सी, हॉटेल कॉस्मो, हॉटेल सात सितारा, हॉटेल साई इंटरनॅशनल, हॉटेल अतिथी रॉयल इन, हॉटेल उत्सव यांसारखी सुमारे ३० ते ४० बेकायदेशीर लॉजिंग-बोर्डिंग दुपारी १२ वाजल्यापासून रात्रभर बिंधास्तपणे सुरू असतात. येथे उत्तर प्रदेश, बिहार व बांगलादेशातून आणलेल्या महिला व अल्पवयीन मुलींचा वापर करून मानवी तस्करीद्वारे वेश्या व्यवसाय चालवला जात आहे.

यांसारख्या तब्बल ३० ते ४० बेकायदेशीर लॉजिंग-बोर्डिंग *सुरू आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणारे हे लॉजेस रात्रभर बिंधास्तपणे चालवले जातात. या ठिकाणी उत्तर प्रदेश, बिहार, इतर राज्ये आणि बांगलादेशातून आणलेल्या महिला व अल्पवयीन मुलींकडून मानवी तस्करीद्वारे वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकारांमुळे रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या सुज्ञ नागरिकांना आणि महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रात्री-अपरात्री या भागातून चांगल्या घरातील महिला किंवा मुलींना प्रवास करणे अत्यंत असुरक्षित आणि भीतीदायक ठरत आहे.

पहाटेपर्यंत अनधिकृत डान्स बार अन् गुन्हेगारांचा वावर
लॉजेससोबतच या भागात अनेक अनधिकृत डान्स बार पहाटे ३ वाजेपर्यंत नियम धाब्यावर बसवून सुरू असतात. या बेकायदेशीर व्यवसायांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि परराज्यांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असामाजिक तत्व या लॉजिंग आणि डान्स बारमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. यामुळे भविष्यात या भागात अत्यंत भीषण कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law & Order) प्रश्न निर्माण होण्याचा धोका अनिलभाऊ महाजन यांनी आपल्या विश्लेषणातून व्यक्त केला आहे.
‘पीटा’ (PITA) अंतर्गत कडक कारवाईची जोरदार मागणी
या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खालील प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात येत आहेत:
* भिवंडी बायपास येथील सर्व ३० ते ४० लॉजिंग-बोर्डिंगची तात्काळ आणि कसून अधिकृत तपासणी करण्यात यावी.
* मानवी तस्करी आणि अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या स्थानिक दलाल आणि महिला दलालांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.
* दोषी लॉजेस आणि अनधिकृत डान्स बारवर ‘पीटा’ (PITA – Anti Human Trafficking Law) अंतर्गत कडक कारवाई करून ते कायमचे सील करण्यात यावेत.
* ठाणे पोलीस आयुक्तालय, भिवंडी-निझामपूर महानगरपालिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्त मोहीम राबवून या परिसराला या विळख्यातून मुक्त करावे. असे अनिल महाजन यांनी पोलीस आयुक्त ठाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Share.