दिनांक :- २१-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,ठाणे:- ठाणे शहरात बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी जुगाराचे एक अत्यंत मोठे आणि धोकादायक रॅकेट सक्रिय झाले आहे. या ऑनलाईन लॉटरी जुगारामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.”गर्जा महाराष्ट्र न्यूज”चॅनेल’च्या गोपनीय टीमने ठाणे शहरात केलेल्या विशेष पाहणी व सर्वेदरम्यान परिमंडळ १ आणि परिमंडळ ५ च्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट उघडपणे चालवले जात असल्याचे समोर आले आहे.

तपासातील प्रमुख मुद्दे व धक्कादायक बाबी:
ठाणे शहरात मोठे रॅकेट सक्रिय: “गर्जा महाराष्ट्र न्यूज” ने विशेष लक्ष केंद्रित करून प्रथम ठाणे शहराचा आढावा घेतला असता, शहरात ऑनलाईन लॉटरी जुगाराचे अजस्र जाळ पसरल्याचे आणि एक मोठे रॅकेट उघडपणे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

‘मोहम्मद’ नावाच्या व्यक्तीचे नेटवर्क: तपासादरम्यान मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीचे रॅकेट सक्रिय असल्याचे आढळले आहे. या व्यक्तीचे अनेक डिस्ट्रीब्युटर्स आणि ऑनलाईन लॉटरी जुगाराची दुकाने ठाणे स्टेशन परिसर, दिवा स्टेशन परिसर तसेच परिमंडळ १ आणि ५ मध्ये सर्रास थाटण्यात आली आहेत.

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह: शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात जुगाराचे रॅकेट सुरू असताना स्थानिक पोलीस प्रशासन, परिमंडळ १ व परिमंडळ ५ चे उपायुक्त (DCP) आणि वरिष्ठ अधिकारी यावर कारवाई का करत नाहीत, असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

*अवैध पाठिंब्याची चौकशी: या मोहम्मद नावाच्या व्यक्तीला कोणाचा सामाजिक, राजकीय किंवा शासकीय पाठिंबा आहे? तो कोणत्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला? याची सखोल माहिती “गर्जा महाराष्ट्र न्यूज” ‘ची टीम गोळा करत आहे.

वरिष्ठ स्तरावर तक्रार आणि पुढील कारवाई: या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत”गर्जा महाराष्ट्र न्यूज” चॅनेल’चे मुख्य संपादक श्री.अनिल भाऊ महाजन आणि त्यांची टीम सोमवारी सर्व सविस्तर पुराव्यांसह वरिष्ठ स्तरावर प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार दाखल करणार आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने:
(०१) राज्याचे गृहमंत्री, (०२) पोलीस महासंचालक (DGP), (०३) अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), (०४) गृह प्रधान सचिव
(०५) ठाणे पोलीस आयुक्त श्री.आशुतोष ठुंबरे या सर्वांची भेट घेऊन या ऑनलाईन लॉटरी जुगाराचे रॅकेटचे संपूर्ण जाळे आणि पुरावे सादर केले जातील.

ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ ०१ व परिमंडळ ०५ मधील पोलीस उपायुक्त काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष.

Share.