Author: Team GarjaMaharashtra

दिनांक :- ३१/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, पाचोरा (विशेष प्रतिनिधी): पाचोरा शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमुळे होणारी नागरिकांची घुसमट थांबवण्यासाठी नगर परिषदेने ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’ अंतर्गत ५ कोटी रुपये खर्चून बांधलेला नवीन पूल गेल्या सहा महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. हा पूल त्वरित सुरू न झाल्यास वरिष्ठ पत्रकार,सामाजिक नेते श्री.अनिल महाजन यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्याने नगरपालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. शहरवासीयांची ट्रॅफिकच्या जाचातून सुटका कधी? सध्या पाचोरा शहरातून गावातून होणाऱ्या वाहतुकीमुळे आणि अत्यंत अरुंद रस्त्यांमुळे रोजच मोठी ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होते. विशेषतः कृष्णापुरी नदीवरील पूल आणि कृष्णापुरी भागातील रस्ता अतिशय अरुंद असल्याने येथे तासनतास वाहनांच्या…

Read More

दिनांक :- ३१/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या औद्योगिक पट्ट्यात काही बेजबाबदार कारखानदारांकडून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. विशेषतः भिवंडी व परिसरात ३०० ते ५०० अनधिकृत जीन्स फॅक्टरीज आणि बेकायदेशीर टायर कंपन्यांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले असून परिसरात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा धक्कादायक आरोप ‘ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशन’चे चेअरमन व ज्येष्ठ समाजसेवक-पत्रकार श्री.अनिलभाऊ महाजन यांनी केला आहे. रात्री-अपरात्री केमिकल टँकर्सचे डम्पिंग आणि घातक धूर. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात बाहेरील जिल्ह्यांमधून रात्रीच्या वेळी केमिकलचे मोठे टँकर्स आणून हे घातक रासायनिक…

Read More

दिनांक :- ३०/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाविंद्रा परिसरामध्ये अवैध हुक्का पार्लर्सचा सुळसुळाट झाला असून, आता या काळ्या धंद्यांची पोलखोल करण्यासाठी मीडिया सरसावला आहे. चाविंद्रा भागातील या बेकायदेशीर हुक्का पार्लर्सचे अचूक लोकेशन, पूर्ण पत्ता आणि तिथला थेट व्हिडिओ पुरावा घेऊन गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल’ ची टीम लवकरच प्रत्यक्ष दर्शनी लाईव्ह दाखवणार आहे. ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक (ॲडिशनल एसपी) मित्तल साहेब आणि भिवंडी ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे हा थेट लाईव्ह पुरावा सोपवला जाणार असून, यामुळे भिवंडी ग्रामीणमध्ये नक्की किती हुक्के पार्लर मोठ्या प्रमाणावर हे अवैध धंदे सुरू आहेत, हे सर्वांसमोर उघड होणार आहे.…

Read More

दिनांक :- २९/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी शहर हे कामगारांचे आणि उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. देशभरातून पोटापाण्यासाठी आलेल्या लूम कामगारांच्या हक्काच्या घराची गरज ओळखून या भागात गृहनिर्माण प्रकल्प, चाळी आणि इमारतींचे पेव फुटले आहे. मात्र, याच गरजेचा गैरफायदा घेत भिवंडीत सध्या ‘भूमाफिया’ आणि अवैध बांधकाम करणाऱ्यांची एक मोठी आणि धोकादायक गँग सक्रिय झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अवैध बांधकामांना भिवंडी महानगरपालिकेच्या ०५ हि प्रभागातील बीट निरीक्षकांचे थेट अभय असल्याचे समोर आले असून, या माध्यमातून दरमहा लाखो-कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि लाचखोरी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आता होत आहे. अवैध मुख्य बिल्डरांना पाठीशी का घातले जाते? भिवंडी महानगरपालिकेच्या…

Read More

दिनांक :- २८/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी विभागातील नवीन मुलचनाड कंपाउंड शेलार पालोर रोड काटई गाव, भिवंडी, जिल्हा ठाणे परिसरातील बेकायदेशीर ‘धनलक्ष्मी डाईंग’ कारखान्या विरोधात आता ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल व ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाऊंडेशनची टीम ‘ च्या कार्यालयात पुराव्यानिशी लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. या अवैध डाईंग कारखान्यामुळे परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पुरावे समोर आल्यानंतर, ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’व ‘ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाऊंडेशन’ ने हे प्रकरण थेट वरिष्ठ पातळीवर लावून धरले आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) वरिष्ठ अधिकारी, मेंबर सेक्रेटरी तसेच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पुराव्यांसह लेखी तक्रार…

Read More

दिनांक :- २४/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी शहरातील निजामपुरा पोलीस स्टेशन व कोनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नदी-नाले आणि पाणवठ्यांमध्ये काही कंपन्यांकडून स्थानिक समाजकंटकांच्या संगनमताने रात्रीच्या वेळी टँकरद्वारे विषारी औद्योगिक केमिकल व रासायनिक सांडपाणी अवैधरित्या सोडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज रात्री उशिरा काही टँकर नदी-नाल्यांच्या परिसरात येऊन विषारी रासायनिक द्रव सोडतात. या रसायनांमधून तीव्र दुर्गंधी पसरत असून परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच नदी-नाल्यांचे पाणी प्रदूषित होत असल्याने पर्यावरणाचे मोठ्या…

Read More

विरार येथे अवैद्य केमिकल पासून ताडी बनविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू. बेकायदेशीर ताडी निर्मितीच्या कथित गोडाऊनवर दारूबंदी विभाग कारवाई कधी करणार? एका परवान्यावर पाच ते सहा ताडी विक्री केंद्रे सुरू असल्याचा आरोप;सखोल चौकशीची मागणी दिनांक – २३/०७/२०२६ विरार/पालघर ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विरार पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात चालविल्या जाणाऱ्या ताडी/माडी विक्री केंद्रांबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून, परवाना अटींचे उल्लंघन, प्रशासनाची दिशाभूल तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विक्री केंद्रांवर अधिकृत नामफलक, परवाना क्रमांक, परवान्याच्या अटी तसेच कायद्यानुसार प्रदर्शित करावयाची आवश्यक माहिती लावण्यात आलेली नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे सदर केंद्रे कायदेशीर…

Read More

दिनांक :- २०/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, मुंबई प्रतिनिधी :- देशात आणि राज्यात वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाला गती देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर *‘ग्रीन इंडिया पॉल्युशन कंट्रोल फाउंडेशन’या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असणारे प्रसिद्ध समाजसेवक श्री. अनिल महाजन यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वातून या फाउंडेशनची सुरुवात झाली असून, ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.* राज्यात पर्यावरण क्षेत्रात अनेक स्वयंसेवी संस्था (NGO) कार्यरत असल्या, तरी प्रत्यक्षात जमिनीवर उतरून प्रभावीपणे काम करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. हीच उणीव भरून काढत ‘ग्रीन इंडिया पॉल्युशन कंट्रोल फाउंडेशन’ आता संपूर्ण ताकदीने…

Read More

दिनांक :- २०/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, उल्हासनगर,प्रतिनिधी :- आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. घर, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन हेल्थ कोच निलम गणेश पुजारी यांच्या माध्यमातून महिला आरोग्य जनजागृती मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी सुमारे अडीच ते तीन हजार महिलांचे आरोग्यविषयक समुपदेशन करून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.या समुपदेशनाद्वारे संतुलित आहार, योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य आणि आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला We R More कंपनीच्या पहिल्या डायमंड तसेच…

Read More

दिनांक :- १३/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, उल्हासनगर, प्रतिनिधी :-महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या दि. १४ जुलै २०२६ रोजी झालेल्या उल्हासनगर दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांचा आढावा, शासकीय योजनांचे परीक्षण तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. याच दिवशी उल्हासनगर महानगरपालिका व शासकीय रुग्णालयाच्या वतीने आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना Iron and Folic Acid Syrup IP (50 ml) या औषधाचे वितरण करण्यात आले. मात्र वितरित करण्यात आलेल्या औषधाच्या बाटलीवरील तपशीलानुसार Batch No. : LAV25131AL, उत्पादन दिनांक (MFG) : जून २०२५ आणि मुदत समाप्ती (EXP) : ऑगस्ट २०२६ अशी नोंद आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी या औषधाची मुदत संपण्यास अवघा एक महिना…

Read More