Author: Team GarjaMaharashtra

धर्मेंद्र आणि त्याच्यासह दोन जणांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने समन्स बजावले आहे. गरम धरम ढाब्याच्या फ्रँचायझी प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत दिल्लीतील एका व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे. ‘गरम धरम ढाब्यात गुंतवणूक करण्यासाठी दिशाभूल’ एएनआयच्या वृत्तानुसार, व्यावसायिक सुशील कुमार यांच्या तक्रारीनंतर न्यायदंडाधिकारी यशदीप चहल यांनी हे समन्स पाठवले आहे. गरम धरम ढाब्यात गुंतवणूक करण्यासाठी आपली दिशाभूल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पहिल्या तपासात तक्रारदाराने दिलेले पुरावे 5 डिसेंबर रोजी न्यायमूर्तींनी डॉ. आरोपीने स्वत:च्या फायद्यासाठी फिर्यादीला प्रवृत्त करून फसवणूक केल्याचे दिसून येते. धर्मेंद्र आणि इतर दोघांना फसवणूकीच्या कलम 420, कट रचण्याच्या कलम 120B आणि आयपीसीच्या कलम…

Read More

दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- संजय मल्होत्रा ​​हे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे गर्व्हर्नर म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी दिली. ते विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, 11 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील.

Read More

दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांचा गळा दाबून खुन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मांजरी फुरसुंगी रस्त्यावरुन अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितले की, सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांना शिंदवणे घाटात आणल्याचे दिसून येते. तेथे त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचे दिसून आले. शिंदवणे घाटात सायंकाळी गेलेल्या लोकांना हा मृतदेह दिसला. त्यांनी उरुळी कांचन पोलिसांना याची माहिती…

Read More

दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने सोमवारी हाहाकार उडाला. बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 10.45 च्या सुमारास मोठा अपघात झाला. बेस्टची ३३२ क्रमांकाची बस एका सोसायटीची भिंत तोडून नियंत्रणाबाहेर जाऊन थांबली, अनेक वाहने आणि सुमारे ३० जणांना चिरडले. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 26 जण जखमी झाले. मृतांमध्ये ३ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. नियंत्रणाबाहेर गेलेल्या…

Read More

दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- शिवसेनेच्या दबावानंतर मुंबईत भरघोस वीजबिल देणारे अदानी कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर लवकरच बदलण्यात येणार आहेत. या मीटरमुळे ग्राहकांना वाढीव बिलांचा सामना करावा लागत होता. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत शिवसेनेने काल कुलाबा येथील इलेक्ट्रिक हाऊसवर निदर्शने करत प्रशासनाला घेराव घातला. या वेळी बेस्ट प्रशासनाने नवीन मीटर बसवण्याचे काम थांबवून आधीच बसवलेले मीटर बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे या स्मार्ट मीटरना गुजरात आणि नागपूरमध्येही विरोध झाला होता, त्यामुळे ते तिथेच थांबवण्यात आले होते. केंद्र सरकारच्या नवीन धोरणांतर्गत बेस्टने मुंबईत स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली होती, मात्र या मीटर्समुळे वीज बिलात…

Read More

दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर औद्योगिक राज्य असून देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये, राज्याचे 14 टक्क्यांपेक्षा अधिक योगदान आहे. थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला अधिक पसंती मिळते. मागील आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी होता. तसेच सन 2024-25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 1,13,236 कोटी रुपये इतक्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने देशात पुन्हा प्रथम स्थान प्राप्त केले आहे. ही गुंतवणूक, मागील वर्षाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले.            विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहात संबोधन केले.…

Read More

दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र शासन तीव्र निषेध करीत आहे. मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध…

Read More

दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्नाटक विधानसभेतील प्रतिमा काढणार असल्याचे वक्तव्य केले, हे गंभीर असून या घटनेचा राज्य शासन निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी  ठामपणे उभे असून बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.             मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील 12…

Read More

दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा हे कर्नाटक व देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. उच्च विद्याविभूषित असलेले एस एम कृष्णा एक अनुभवी संसदपटू होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षातर्फे ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले. साहित्य, टेनिस व शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या कृष्णा यांनी राजभवन येथे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यपाल पदाची…

Read More

दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अनधिकृत अतिक्रमणाचा विळखा पाचोरा शहरात अतिक्रमण जागेवर ठेवलेल्या टपऱ्या वरती बेक़ायदेशीर सट्याची पाने लिहले जात आहे. पाचोरा नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब सदर टपऱ्या उचलून सदर जागा सील करावे  कोणी सील तोडल्यास मोठा दंड आकारण्यात यावा. पाचोरा शहरात परसलेली ही घाण दूर करावी. शहरातील सर्व  मुख्य चौक आणि बाजार पेठ मधील अनाधिकृतपणे सट्टा सुरु असणाऱ्या टपऱ्या  शोधून ताबडतोब नगरपालिका मार्फत उचलण्यात याव्या पाचोरा येथील कर्तव्यदक्ष न.पा मुख्यअधिकारी  स्थानिक प्रशासन यांनी तात्काळ लक्ष घालावे अन्यथा सर्व टपऱ्या वरील प्रकार नगरविकास सचिव आणि जिल्हाधिकारी  जळगाव यांना लाइव्ह पाठवण्यात येईल. पाचोरा शहरातील अतिक्रमण मध्ये अवैध धंदे सट्टा पत्ता…

Read More