Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार आहे. हा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात…

Read More

दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदुषण कमी झाले असून सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी काढले. स्वच्छता ही सेवा-2024 (SHS) या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंग्री मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर,…

Read More

दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. १८ सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पद्मश्री भारत भूषण त्यागी, पद्मश्री कमल सिंग, पद्मश्री गेनाजी…

Read More

दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिले. यामुळे आता अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेतली होती. त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृष्यप्रालीद्वारे), विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलींद बोरीकर, उपसचिव अजित कवडे, अवर सचिव अरविंद शेटे, अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे माजी अध्यक्ष…

Read More

दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करीत असून यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह…

Read More

दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वर्षातील बहुप्रतिक्षित लाँच नवीन किया कार्निवल लिमोझिनने पहिल्‍या २४ तासांमध्‍ये १,८२२ प्री-ऑर्डर्ससह सेगमेंट-लीडिंग टप्‍पा गाठला आहे. यामुळे विभागासाठी नवीन बेंचमार्क स्‍थापित झाला आहे, तसेच मागील जनरेशनच्‍या फर्स्‍ट-डे १,४१० बुकिंग्‍जचा टप्‍पा देखील पार झाला आहे. किया कार्निवलच्‍या नवीन जनरेशनने तिच्‍या श्रेणीमध्‍ये ट्रेण्‍डसेटर म्‍हणून आधीच दर्जा स्‍थापित केला आहे आणि ३ वर्षांच्‍या कार्यसंचालनामध्‍ये १४,५४२ युनिट्सच्‍या विक्रीची नोंद केली आहे. नवीन किया कार्निवल लिमोझिनसाठी बुकिंग्‍जना १६ सप्‍टेंबर २०२४ रोजी सुरूवात झाली. ही वेईकल किया इंडियाची ऑफिशियल वेबसाइट आणि देशभरातील अधिकृत डिलरशिप्‍सच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करून देण्‍यात आली. ग्राहकांनी सुरूवातीची रक्‍कम म्‍हणून २००,००० रूपये देय देत बुकिंग्‍ज सुनिश्चित…

Read More

दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट म्हणून देण्यासाठी आदर्श आहेत. बॉलीवूडचे लाडके कलाकार हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या माध्यमातून ही घड्याळे सादर करण्यात आली आहेत. ही दोन्ही घड्याळे राडोची खास डिझाईन परंपरा, मटेरियल्स निपुणता आणि सर्जनशील महत्त्वाकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. राडोचे सीईओ अॅड्रियन बॉसहार्ड म्हणाले, “राडो मध्ये असे टाइमपीस बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो, जे…

Read More

दिनांक –१९/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.१७ सप्टेंबर, ते दि.१७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये सुमारे १५०० रुग्णालयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये, धर्मादाय संस्था, मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि लोक सहभागातून हे आरोग्य शिबिरे पार पडणार आहे. झोपडपट्ट्यांमध्ये, वाड्यावस्त्यांवर २५ हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ४० लाख…

Read More

दिनांक –१८/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ या दिवशी डॉ. सुचेता परांजपे यांचे ऋग्वेदाचा परिचय या विषयावरील व्याख्यान होईल. शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी त्यांचेच उपनिषदे-कथांमधून तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यान होईल. महोत्सवाचा समारोप कै. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित संगीत नाटकातील भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीगीत गंगा हा रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ या दिवशी होईल. याची संकल्पना आणि मार्गदर्शन शुभदा दादरकर यांची…

Read More

दिनांक –१८/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती आदी यावेळी उपस्थित होते. मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांनी यावेळी प्रशासनाच्या वतीने चौपाटीवर उभारण्यात आलेल्या विविध मंडपांना भेट देऊन गणरायांची आरती केली. तसेच देश विदेशातून आलेल्या गणेश भक्तांशी संवाद साधून…

Read More