Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाची (CPA India Region) 10 वी परिषद दिनांक 23 व 24 सप्टेंबर, 2024 रोजी नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सचिव-1 (कार्यभार) जितेंद्र भोळे तसेच सचिव-2 (कार्यभार) डॉ. विलास आठवले हे उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय परिषदेमध्ये “शाश्वत आणि समावेशी विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर विचारमंथन होणार आहे. चर्चासत्रात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधिमंडळ विधानपरिषद…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. 22) बाल कर्करुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या. राज्यपालांच्या सूचनेनुसार लहान मुलांना राजभवनाची सैर करविण्‍यात आली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते. यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय.के. सप्रू, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रू बिसेन व कार्यकारी संचालक निता मोरे आदि उपस्थित होते.

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार असून सोमवार, 23 सप्टेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. कोनशिला अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती ए.एस.ओक, न्यायमुर्ती दीपंकर दत्ता, न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय उपस्थित राहणार आहेत. सध्या मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे 16 ऑगस्ट 1862 रोजी स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. नोव्हेंबर…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला प्रार्थना समाज मुंबई येथुन हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, भक्तियोग आचार्य यशोविजय महाराज, अचल गच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वर महाराज तसेच जैन संघांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. तीर्थंकर भगवान महावीर यांनी समाजाला अहिंसा, सत्य आणि करुणा ही तत्त्वे दिली आहेत. ही रथयात्रा भगवान महावीरांच्या शिकवणीची आठवण करून देणारी आहे असे सांगून महावीरांची तत्वज्ञान आज विशेष प्रासंगिक आहे असे राज्यपालांनी सांगितले रथयात्रेत सहभागी झालेल्या जैन संघाचे अभिनंदन करुन ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन नागरिकांसाठी 21 व 22 सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचा वर्षपुर्ती सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या आकर्षक कलाकृतींची…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सकल मातंग समाजाच्या अनेक मागण्या आहेत. यापैकी बऱ्याचशा मागण्या शासनाने पूर्णत्वास नेल्या आहेत. समाजाच्या उर्वरित मागण्या पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. सकल मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. सकल मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयातील समिती कक्षामध्ये आयोजित बैठकीत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सकल मातंग समाजाच्यावतीने मच्छिंद्र सकटे, श्री. वाडेकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सोना बागुल आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते.…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षणाचा लाभ देण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीस मुदतवाढ देण्याची मागणी समाजाकडून करण्यात आली होती. त्यानुसार समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच सकल धनगर समाजाच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयातील समिती कक्षामध्ये आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शिंदे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव व विधी परामर्ष सुवर्णा…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन २० सप्टेंबर, २०२४ रोजी बुरहानी महाविद्यालय माझगाव, मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. या कार्यक्रमास आमदार श्रीमती यामिनी जाधव, तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव हे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील व्यवसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा, या अनुषंगाने राज्यामधील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. या आचार्य चाणक्य कौशल्य विकास १००० केंद्रांचा उद्घाटन समारंभ २०…

Read More

दिनांक –२१/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १५०० मतदारांची संख्या आता सरासरी १२०० पर्यंत असेल, त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली असून परिणामी मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे. निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक…

Read More