दिनांक :१६ सप्टेंबर २०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,सांगली/विटा (नौशाद शेख) प्रतिनिधी :- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली आणि विटा पोलिस ठाणे यांनी धडक कारवाई करत विटा-तासगाव रस्त्यावरील श्री मंगल कार्यालयासमोरून दत्तात्रय अंकुश पाखरे (रा. हिवरे, ता. खानापूर) यास रंगेहात ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून तब्बल ९६५ ग्रॅम वजनाचा आणि ४२ लाख ८२ हजार रुपये किमतीचा अत्यंत घातक ‘मेफेड्रोन’ (एम.डी.) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ड्रग्जसह दोन मोबाईल आणि एक मारुती सुझुकी अल्टो कार असा एकूण ४२,८२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर. यांच्या मार्गदर्शनाखाली, स्था. गु.अ. शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे,सपोनि राजेंद्र यादव, उपनिरीक्षक महादेव पोवार व हवालदार उदय साळुंखे. यांच्या पथकाला अत्यंत महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, एक संशयित इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून विटा-तासगाव रोडवर एम.डी. ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित दत्तात्रय पाखरे याला जेरबंद केले. त्याची कसून झडती घेतली असता, कारच्या ड्रायव्हर सीटखाली आणि डिकीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या व रिकाम्या कॅप्सूलमध्ये हा अमली पदार्थ लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. या कारवाईत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांच्या पथकाने सहकार्य केले.
पोलिसांच्या कसून चौकशीत आरोपी दत्तात्रय पाखरे याने एकामागून एक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केरळमधील कासारगोड येथील ‘अब्दुल निझार मोईद्दीन कुणी ऊर्फ आदिलखान’ आणि ‘मोहम्मद शेमीर ऊर्फ समीर’ या तस्करांकडून तो या कॅप्सूल आणत असल्याचे तपासात समोर आले. विमानतळावरून आणलेल्या या कॅप्सूलमधील पावडर एकत्र करून ती विटा व परिसरात विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली आहे.
Breaking
- विटा येथे तब्बल ४२ लाखांचे ‘एम.डी.’ ड्रग्ज जप्त ,सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व विटा पोलिसांची धडक कारवाई, केरळ कनेक्शन उघड.
- महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालतीचे खानापूर तालुक्यात आयोजन महसुली दाव्यांचा सामंजस्याने व तडजोडीने जलद निपटारा करण्याची सुवर्णसंधी
- उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री,माळी समाज बांधव श्री.केशव प्रसाद मोर्य यांची महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.अनिल महाजन यांनी घेतली भेट लखनऊ येथे.
- मांजर्डे-नरसेवाडी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन ग्रामीण विकासासोबत क्रीडा सुविधांनाही प्राधान्य : आमदार सुहास बाबर
- लखनऊ में अति पिछड़ा जातीय महा मेला हुवा संपन्न.
- लखनऊ मध्ये अति मागासवर्गीय महामेळावा संपन्न
- आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आयुष्याची खरी कमाई: अनिल महाजन यांचा तरुण पिढीला भावूक संदेश.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर माळी समाजाचा झेंडा फडकवला; पूरग्रस्तांच्या दुःखात धावून जात अनिल महाजन यांनी नाकारला सत्कार

