दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे काल रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाल्याची दुःखदायक घटना घडली असून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री ८:०६ वाजता दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले होते. रात्री ९:५१ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्नाटकमधील बेळगाव येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रद्द करण्यात आली आहे. याशिवाय २७ डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – २६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ज्या भूमीत पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने १९७१ मध्ये हुसकावून लावले होते. त्याच भूमीत आता पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी सैन्याला प्रशिक्षण देणार आहे. बांगलादेशच्या विद्यमान अंतरिम सरकारने पाकिस्तानशी लष्करी आणि सामरिक संबंध वाढवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, यामुळे भारतासमोर नवीन आव्हान निर्माण होऊ शकतात. बांगलादेश लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक फेब्रुवारी २०२५ मध्ये तेथे पोहोचणार आहे.
दिनांक – २१/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यंदा मंत्रिमंडळाच्या यादीत कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता सर्वांनाच होती. अनेकांचा पत्ता कट झाला आणि नाराजीनाट्य देखील रंगताना दिसल. नागपुरात शपथविधी कार्यक्रमानंतर लगेच अधिवेशन असल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त केल्याने महायुतीचे तिन्ही नेते कोंडीत सापडल्याचं चित्र दिसलं. अशात, मागील 4-5 दिवसापासून खातेवाटप रखडल्याने नेमकं खातेवाटप कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. मंत्री न झालेल्यांची नाराजी आणि अपेक्षित विभाग न मिळाल्याने नाराजी, अशी दुहेरी अडचण एकाच वेळी येण्याऐवजी वादळ शांत करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांचा दिसतोय. सोबतच, काही खात्यांसंदर्भात अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी जोरदार मागणी करताना दिसत आहे, त्यामुळे…
दिनांक –२१/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक मोठा निर्णय घेत कंपनीतील 10 टक्के व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. पिचाई यांचा हा निर्णय गुगलच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या “कार्यक्षमता वाढवण्या”च्या प्लॅनिंगचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. सुंदर पिचाई यांनी बुधवारी आयोजित एका ऑल-हॅन्ड्स मिटिंगमध्ये, या निर्णयाचा उद्देश गुगलची कार्यक्षमता दुप्पट करणे, असा असल्याचे कर्मचाऱ्यांसोबत बोलताना म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ही कपात प्रामुख्याने मॅनेजर, डायरेक्टर आणि उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.
दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भाजपने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, रामदास आठवले यांच्या एकमेव आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आम्हाला कोणतेही प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. दरम्यान, रामदास आठवले यांना नागपुरातील शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रणही मिळाले नाही. त्याबद्दल भाजपने रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “14 तारखेला शपथविधी होणार होता, पण आमचे आमदार…
दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मी काही लल्लू पंजू आहे का ? मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का? असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांना सुनावले आहे. तसेच ते स्वत:ला सर्वांपेक्षा जास्त हुशार आणि जास्त शहाणे समजतात असाही टोला लगावत भुजबळांनी आपल्या मनातील खदखदच व्यक्त केली आहे. छगन भुजबळ म्हणाले, मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का? मी काही लल्लू पंजू आहे का?तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का ? काय तर म्हणे…दादाचा वादा … माझा लढा मंत्रिपदाचा नाही अपमान आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वगैरे मानत नाही ही लोकशाही…
दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सोनिया गांधी आपल्याला एकेकाळी मुख्यमंत्री करणार होत्या, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील दिल्या. “ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे. अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार. कोणाविषयी दुष्मनी विसरून जा. आरक्षणाचा भुलभूईय्या संपणार आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले. “काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण मला मंत्री केलं नाही. मंत्रिपद अनेकदा मिळाली. त्यामुळे आता नाही भेटलं, त्याचा काही वाद नाही.…
दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून उपराजधानी नागपुरात सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि विधानपरिषद आमदार उद्धव ठाकरे हे आज अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि पदी विराजमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही सदिच्छा भेट घेतली असल्याची शक्यता आहे.
दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरवले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. 25…
दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. रविवारी नागपुरात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४२ झाली आहे. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पूर्णपणे सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे या सरकारमध्ये तीन महिला अधिकारी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्रात डीजीपी, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव या तिन्ही महत्त्वाच्या पदांची कमान महिला अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांच्याकडे मुख्य सचिवपदाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने 30 जून 2024 रोजी सुजाता सौनिक यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपवला होता. यासह सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव…