दिनांक – २४/०६/२०२५, मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माळी समाजातील जळगाव जिल्ह्यातील, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक तात्काळ सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना अटक करावी. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले लेखी पत्र.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव गावातील तेजस महाजन १३ वर्षीय बालक हत्याप्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघाने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच अन्यायग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्र माळी समाज महासंघ एकनिष्ठ पणाने उभे आहे व महासंघाचा जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तसे अधिकृत पत्र महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या मुंबई कार्यालयातून प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांच्या आदेशाने मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात पाठवण्यात आलेले आहे. लवकरच यावर कारवाई होऊन अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळेल.

Share.