दिनांक – ०४/०४/२०२५, पाचोरा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा शहरातच नव्हे तर पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या ‘मधुर खान्देश’ या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त आज दिनांक ०४ एप्रिल २०२५ शुक्रवार रोजी नवीन व्यापारी संकुल भडगाव रोड येथे सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा स्नेह मेळावा जेष्ठ पत्रकार मा.श्री.अनिल महाजन (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार मा.श्री.दिलीप भाऊ वाघ,उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या मा.सौ.वैशालीताई सुर्यवंशी, प्रांताधिकारी मा.श्री.भूषण अहिरे,तहसीलदार मा.श्री.विजय बनसोडे,उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री.धनंजय वेरुळे, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.अशोक पवार,पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी मा.श्री.मंगेश देवरे, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मा.श्री.अमोल भाऊ शिदे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिनाचा हा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या स्नेह मेळाव्यात मधुर खान्देश वृत्तसंस्थेला ज्यांनी, ज्यांनी भरभरुन साथ आणि प्रतिसाद दिला यामुळे मधुर खान्देश आज प्रगतीपथावर आहे याची जाणीव ठेवून आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून तसेच सामाजिक, राजकीय, व्यापारी वर्ग याचे मार्गदर्शनपर मनोगत ऐकुन घेण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले असून यांच्याही सत्कार करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक मा.श्री.राहुल महाजन यांनी सांगितले.

तसेच या स्नेह मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यमान आमदार मा.श्री.किशोर आप्पा पाटील व प्रांताधिकारी मा. श्री. भुषण अहिरे साहेब यांच्या हस्ते दोन पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आयोजन मा.श्री.राहुल महाजन यांनी सांगितले असून हे सदरचे दोन पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहेत याबाबत संपूर्ण पाचोरा, भडगाव शहरासह तालुक्यातील जनतेची उत्सुकता शिगेला लागली आहे.

Share.