दिनांक – ११/०६/२०२५,मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- श्री.संदीप पटनावर भिवंडी पाणीपुरवठा विभाग यांच्या विरुद्ध प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय यांनी दिले कार्यवाही चे आदेश भिवंडी महानगर पालिका आयुक्त यांना शासनाकडून लेखी आदेश प्राप्त.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव, वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन यांनी नगर विकास प्रधान सचिव तसेच नगर विकास मंत्री यांच्याकडे भिवंडी येथील पाणीपुरवठा विभागात अभियंता श्री.संदीप पटनावर यांची तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने प्रधान सचिव नगर विकास यांनी श्री.संदीप पटनावर यांची गेल्या दहा वर्षापासून एकच ठिकाणी एकच जागेवर पाणीपुरवठा विभागात नेमणूक कशी नियमानुसार बदली का नाही ? तसेच भिवंडी शहरात आणि पाणी चोरीचे गंभीर गुन्हे घडत आहे. तसेच पाणीपुरवठा विभागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत या सर्व बाबींचा आढावा अहवाल नगर विकास मंत्रालयात मागवला आहे. तसेच भिवंडी महानगरपालिका आयुक्त यांना सदर प्रकरणी लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.महाराष्ट्र शासन नगर विकास कक्ष अधिकारी अनिरुद्ध गोसावी यांच्या सहीचे पत्र भिवंडी महानगरपालिका आयुक्त यांना शासनाने आदेश केला आहे.तरी सदर प्रकरणी काय कारवाई आयुक्त स्तरावर होते हे पाहण्यासाठी जनतेचे लक्ष लागले आहे.