Author: Team GarjaMaharashtra

दिनांक – २७/०४/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहरात रोज रात्री ०१ ते ०५ दरम्यान येणाऱ्या कोयला भरून येणाऱ्या ओवरलोड ट्रक सप्लाय जोरात सुरू. कोयला भरून येणाऱ्या ट्रककडे भिवंडी ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष…. दररोज रात्री लाखो रुपयाचा कोयला ओव्हरलोड ट्रक मधून होतोय सप्लाय…. भिवंडी ट्राफिक पोलिसांचा विषय पुन्हा चर्चेला, अनेक नियमबाह्य काम भिवंडी ट्राफिक विभागात सुरू. (01) भिवंडी शहरात दररोज रात्री व आठवड्याला शेकडो ओव्हरलोड ट्रक कोयला भिवंडी शहरात येत आहेत. यावर ट्राफिक पोलीस कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत. (02) स्टोन क्रशर कंपनी येथून भुसा भरून अनेक ओवरलोड शेकडो ट्रक भिवंडी शहरात येत आहेत. (03) भिवंडी शहरात खाच्या रिक्षा मोठ्या…

Read More

दिनांक – २८/०४/२०२६ पाचोरा / जळगाव ,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- पाचोरा शहरातील अनेक तरुण व्यसनाधीन आणि कर्जबाजारी.कुटुंबावर आर्थिक संकटाचे सावट. पाचोरा तालुक्यात अवैध सावकारी बोकाळली आहे. अवैध सावकारी करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेची मागणी. पाचोरा तालुक्यातील काही मास्तर, शिक्षक ,प्राध्यापक,डॉक्टर, सरकारी नोकरदार, अधिकारी, राजकारणी, अवैधरित्या धंदा करणारे लोक या सर्व क्षेत्रातील अनेक लोकांचे पैसे काही ठराविक लोकांच्या माध्यमातून अवैधरित्या मार्केट मध्ये अवैध सावकारीच्या रूपाने फिरत आहे. याला सर्व सामान्य तरुण वर्ग बळी पडत आहेत याला लगाम लागला पाहिजे. सध्या पाचोरा शहरात अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. कर्ज बाजरी होत आहे. 10% 20% 30% दराने व्याजाने…

Read More

दिनांक – २७/०४/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वरिष्ठ पत्रकार ,मुख्य संपादक गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल श्री.अनिल महाजन, मुंबई यांनी भिवंडी ट्राफिक पोलिसांन बाबत तसेच अनधिकृत ट्राफिक वार्डन नेमणुकी बाबत गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे व लवकरच या विषयावर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांची मुलाखती घेणार आहे. भिवंडीत वाहनधारकांना दंड न ठोकता आर्थिक देवाण-घेवाण करून गाड्या सोडण्यात येत आहे. भिवंडी शहरात ट्राफिक पोलिसांचा खाजगी पंटरावर जोर. वार्डन बंदी असताना वार्डन का ? ठेवण्यात येत आहे. भिवंडी ट्राफिक पोलिसांनी बेकायदेशीर खाजगी वार्डन नियुक्त केलेले आहे. अशी सूत्रांची माहिती आहे भिवंडी शहर ट्राफिक पोलीस वाहनधारकांना पकडतात त्यांचे वाहन…

Read More

दिनांक – २७/०४/२०२६ मुंबई ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दक्षिण मुंबईतील पायधोनी येथे एका धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक अहवालानुसार, टरबूज खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, घाटी गल्लीतील त्यांच्या घरी टरबूज खाल्ल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी गंभीर लक्षणे जाणवू लागली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी काही तासांतच त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयेशा (१६) व झैनब (१३) अशी पटली आहे. हे कुटुंब दाट लोकवस्तीच्या भागातील मुघल बिल्डिंगमध्ये राहत होते. स्थानिक वृत्तसंस्था एफ३ न्यूजच्या वृत्तानुसार,…

Read More

दिनांक – २७/०४/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कुंभारवाडा पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली असून, या विरोधात ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. परिसरात विविध तंबाखूजन्य फ्लेवर्सचे हुक्का खुलेआम चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी नाबालिग मुलांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असून ते हुक्का सेवन करत असल्यामुळे व्यसनाधीनतेचा धोका वाढत आहे. स्थानिक प्रशासन आणि कुंभारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित…

Read More

दिनांक – १३/०४/२०२६ पंढरपूर/सोलापूर ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप तब्बल साडेतीन वर्षे उरलेली आहेत. असे असले तरी, राजकीय आखाड्यात आत्तापासूनच जोरदार मोर्चेबांधणी आणि शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. २०२९ च्या विधानसभेचे महत्त्वाचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी अतिशय अचूकपणे बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. याचाच एक मोठा आणि महत्त्वपूर्ण भाग म्हणून पंढरपूर मतदारसंघातून भगीरथ भालके आणि अनिल सावंत हे दोन दिग्गज नेते शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत आहेत. २०२९ सालचा पंढरपूरचा आमदार हा एकनाथ शिंदे यांच्याच विचारांचा असेल, अशी आक्रमक घोषणा भगीरथ भालके यांनी केल्यामुळे पंढरपुरात राजकीय चुरस आत्तापासूनच प्रचंड वाढली आहे. सध्याच्या…

Read More

दिनांक – १३/०४/२०२६ मुंबई ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- संपूर्ण भारताला आणि जगाला आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे दुःखद निधन झाले आहे. या दुःखद घटनेमुळे भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली असून एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शनिवारी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या अनपेक्षित प्रसंगामुळे त्यांना तातडीने मुंबई येथील सुप्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालय येथे वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही दुर्दैवाने उपचारांना यश आले नाही आणि 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्यावर…

Read More

दिनांक – १३/०४/२०२६ नाशिक ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ​नाशिक शहरासह संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसागणिक मोठी भर पडत चालली आहे. त्याच्या काळ्या कारनाम्यांची आणि फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने, एसआयटी (SIT) कडून त्याची अत्यंत बारकाईने आणि कसून चौकशी सुरू आहे. या प्रदीर्घ चौकशी प्रक्रियेमध्ये तो तपास अधिकाऱ्यांसमोर दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे करत आहे. मात्र, काही विशिष्ट प्रश्नांवर तो जाणीवपूर्वक अशी काही अजब उत्तरे देत आहे की, त्यामुळे खुद्द पोलीस अधिकारीही पूर्णपणे बुचकाळ्यात पडले आहेत. ​या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरत आहे ती त्याची फरार पत्नी कल्पना खरात. जेव्हापासून अशोक खरात याला पोलिसांनी…

Read More

दिनांक – २८/०१/२०२६ पुणे/बारामती,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीला येत असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला (Learjet 45) हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील दोन वैमानिक आणि इतर दोन सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे मुंबईहून बारामतीसाठी सकाळी ८ च्या सुमारास निघाले होते. बारामती विमानतळावर सकाळी ८:४५ च्या सुमारास विमान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून घसरले आणि बाजूला कोसळले.…

Read More

दिनांक – २३/०१/२०२६,सांगली / शिराळा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज: कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मासी आला सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतात त्याला जो बाळा जो जो रे जो…. पाळण्याचे स्वर आणि गणपती बाप्पा चा जयघोष करीत भक्तीमय वातावरणात बांबवडे येथील सुयोग गणेश मंदिराकडून दुसऱ्या वर्षीही गणेश जन्मसोहळा साजरा करण्यात आला. गुरुवारी पहाटे मंदिराचे पुजारी प्रकाश वंडकर महाराज यांनी श्री च्या मूर्तीस अभिषेक घालून विधी करण्यात आला. त्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले केले. दुपारी १२ वाजता गणेश जन्म सोहळा साजरा झाला. महाआरती करण्यात आली. गणेश जन्म सोहळ्यावेळी मंदिरसमोर रांगोळ्याच्या पायघड्या, गाभाऱ्यात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची व फुग्याची आकर्षक सजावट तसेच मंदिरावर विद्युत…

Read More