दिनांक – २२/०४/२०२५,मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा शहरात जय बजरंग ड्रिल (ब्लास्टिंग) कंपनी ही अनेक बेकायदेशीर रित्या काम करत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.सायंकाळी सहा वाजल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन कॅप आणि तोटे यांची एकत्रित वाहतूक केली जात आहे. सदरची वाहतूक करणारे हे सर्व राजस्थानी लोक आहेत.शासनाने घालून दिलेल्या नियम अटीप्रमाणे हे काम करत नाहीत.तसेच अनेक ठिकाणी अनधिकृत पणे जीवनाशक वस्तूंचा साठा ते करून ठेवत आहेत याबाबत लवकरच गर्जा महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक तथा वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन हे राजाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जळगाव जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन रीतसर लेखी तक्रार देऊन कार्यवाहीची मागणी करणार तसेच उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहेत. पाचोरा शहरात जय बजरंग ड्रिल (ब्लास्टिंग) या कंपनीच्या अवैध रित्या चालणाऱ्या कामकाजाबद्दल कोणाकडे सविस्तर माहिती असल्यास ती या दिलेल्या ई-मेल आयडी- info.garjamaharashtra@gmail.com वरती पाठवावी. असे आवाहनं गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाकडून करण्यात येत आहे. लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या ब्लास्टिंग कंपनीवर आळा घालणं ही काळाची गरज आहे. सदर कंपनीच्या विरोधात गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या ऑफिसमध्ये स्थानिक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
पाचोरा येथील जय बजरंग ड्रिल (ब्लास्टिंग) कंपनीचा लोकांच्या जीवाशी खेळ सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात उच्चस्तरीय कार्यवाहीची मागणी – अनिल महाजन,वरिष्ठ पत्रकार.
कॅप आणि तोटे यांची बेकायदेशीर रित्या एकत्रित केली जात आहे वाहतूक.