दिनांक :- २३/०६/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, विशेष प्रतिनिधी (मुंबई/ठाणे/नवी मुंबई):- एम.एम.आर.डी. (MMRD) क्षेत्रात येणाऱ्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर,टिटवाळा,भिवंडी, पालघर, रायगड आणि पनवेल परिसरातील अनेक काही लॉजिंग-बोर्डिंगमध्ये सर्रासपणे बेकायदेशीर व अनैतिक प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’ वाहिनीच्या टीमने या संपूर्ण प्रकारावर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी आपल्या हद्दीतील लॉजिंग-बोर्डिंगची आजच कसून तपासणी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शाळा-कॉलेजच्या परिसरात ‘अल्पवयीन’ मुला-मुलींना प्रवेश कसा ?
अंधेरी, चेंबूर, गोरेगाव, मानखुर्द, ठाणे, मिरा-भाईंदर, टिटवाळा, पनवेल आणि गोराई सारख्या पर्यटन व मुख्य भागात मोठ्या प्रमाणावर लॉजिंग-बोर्डिंगचे जाळे पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शाळा आणि कॉलेजच्या आजूबाजूला असणाऱ्या लॉजेसमध्ये अल्पवयीन मुले-मुली (Underage couples) सर्रासपणे आढळून येत आहेत. कोणत्याही कायदेशीर ओळखीच्या पुराव्याशिवाय किंवा बनावट ओळखपत्रांच्या आधारे यांना प्रवेश कसा मिळतो? हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी याबाबत तातडीने शोधमोहीम राबवणे गरजेचे झाले आहे.

‘घंटा पद्धत’ (Hour System) आणि देहविक्रीचा संशयास्पद कारभार
लॉजिंग-बोर्डिंगच्या कारभारावर संशय घेण्यास सर्वात मोठे कारण म्हणजे येथील ‘रुम बुकिंग’ची पद्धत. काही विशिष्ट लॉजेसमध्ये एकच रुम दिवसातून तब्बल ८ ते १० वेळा भाड्याने दिली जाते. अवघ्या एक-दोन तासांसाठी (“घंटा सिस्टीम”) रुम देऊन केवळ चादर बदलली जाते आणि पुन्हा नवीन ग्राहकाला तीच रुम दिली जाते. दिवसातून इतक्या वेळा एकाच रुमचा वापर कशासाठी होतो? काही ठराविक रिक्षा चालक लॉजच्या बाहेर सतत का थांबून असतात? यामागे बाहेरील दलाल आणि लॉज मालकांच्या संगनमताने ‘कपल’च्या नावाखाली देहविक्री (वेश्या व्यवसाय) चालवली जात असल्याचा तीव्र संशय आहे.

पोलीस ‘दैनंदिन नोंदणी रजिस्टर’ तपासतात का?

नियमांनुसार, प्रत्येक लॉजिंग-बोर्डिंग चालकाला आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती, ओळखपत्र आणि येण्या-जाण्याची वेळ ‘दैनंदिन नोंदणी रजिस्टर’मध्ये नोंदवणे बंधनकारक आहे. स्थानिक पोलिसांकडून या रजिस्टरची नियमित तपासणी केली जाते का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. जर तपासणी होत असेल, तर एकाच दिवसात एकाच रुमची अनेकवेळा होणारी नोंद पोलिसांच्या नजरेतून कशी सुटते, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक पोलीस अधिकारी राहणार जबाबदार!

एम.एम.आर.डी. परिसराचा आवाका खूप मोठा असून लाखो नागरिक येथे राहतात अवैद्य लॉजिंग बोर्डिंग अस्वच्छता निर्माण केलेली आहे त्यामुळे चांगल्या महिला मुली यांच्याकडे काही समाजकंटक विकृत पद्धतीने व चुकीच्या नजरेने बघत असतात. या परिसरात विविध पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांतर्गत शेकडो पोलीस स्टेशन कार्यरत आहेत:

मुंबई पोलीस आयुक्तालय: १०० पोलीस स्टेशन
ठाणे पोलीस आयुक्तालय: ३६ पोलीस स्टेशन
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय: ११ पोलीस स्टेशन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय १९ पोलीस स्टेशन
रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय: ३६ पोलीस स्टेशन

या सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना आवाहन करण्यात आले आहे की, जर त्यांच्या हद्दीतील लॉजिंग-बोर्डिंगमध्ये असे चुकीचे व बेकायदेशीर प्रकार सुरू असतील, तर त्याला पूर्णपणे स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PI) आणि संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार धरले जातील.

मुंबई ,ठाणे,नवीमुबंई,रायगड, MMRDA क्षेत्रातील सुरु असेलेले अवैध लॉजिंग, बोर्डिंग आणि त्यांच्या आडून चालणाऱ्या वेश्याव्यवसायाविरोधात ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल’ समूहाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करणे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.

MMRDA क्षेत्रातील ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रांत असे अवैध धंदे सुरू असतील, त्यांची माहिती स्थानिक नागरिकांनी थेट ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल’च्या मुंबई फोर्ट येथील कार्यालयाकडे अथवा दूरध्वनीवर संपर्क साधून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर अवैध लॉजिंग-बोर्डिंग कोणाचेही असो, ते बेकायदेशीर असल्यास त्याची बातमी चॅनेलच्या माध्यमातून ठळकपणे प्रसिद्ध केली जाईल. इतकेच नव्हे तर, या अवैध व्यवसायांना पाठीशी घालणाऱ्या स्थानिक राजकीय नेते, शासकीय प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून थेट पाठपुरावा करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पत्रकार गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक श्री.अनिल महाजन व यांच्या संपूर्ण शेकडो पत्रकार टीम कडून देण्यात आला आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी आजच आपल्या हद्दीत विशेष मोहीम राबवून सर्व लॉजेसची झाडाझडती घ्यावी, अशी मागणी नागरिक आणि पत्रकार वर्गाकडून केली जात आहे. ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’ ची टीम देखील तसेच महिला कामगारांच्या सामाजिक संघटना (NGO) वर्गाकडून केली जात आहे. सोबत काही सामाजिक संस्थांच्या महिला पदाधिकारी (NGO) चालक यांची देखील या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे.

Share.