दिनांक :- २२/०६/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शहरातील अनेक भागांत रात्रभर नियमबाह्य पद्धतीने सुरू राहणारी हॉटेल्स याला कारणीभूत ठरत आहेत. या हॉटेल्सबाहेर रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि टवाळखोरांचा वावर वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या त्रासाकडे भिवंडीचे नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. पवन बनसोडे कधी लक्ष देणार आणि यावर कधी कडक कारवाई करणार? असा संतप्त सवाल आता भिवंडीकर उपस्थित करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील ‘हॉटेल आनंद’, वेलकम हॉटेल. वंजारपट्टी नाक्यावरील ‘बाबा हॉटेल’, आणि खंडू पाडा परिसर तसेच शहरातील इतर छोट्या-मोठ्या गल्ल्यांमध्ये असणारी हॉटेल्स रात्र-रात्रभर सुरू असतात. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेची सर्रास पायमल्ली करत ही हॉटेल्स पहाटेपर्यंत सुरू ठेवली जातात.
गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळतोय वाव
रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या हॉटेल्सच्या परिसरात काही टपोरी आणि टवाळके टोळक्याने उभे राहतात. यामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचाही समावेश असतो. हे लोक रात्रीच्या वेळी येण्या-जाणाऱ्या नागरिकांची छेड काढणे, मोठ्या आवाजात हुज्जत घालणे आणि वाद निर्माण करणे असे प्रकार करत असतात. यामुळे परिसरात कोणत्याही वेळी मोठी गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता पोलीस प्रशासन यावर काय पावले उचलते आणि भिवंडीकरांना या त्रासातून कधी मुक्त करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रभर हॉटेल सुरू असतील त्या-त्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित कारवी त्या करता ठाणे पोलीस आयुक्त, गृह विभाग मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालय अशी मागणी या ठिकाणी जनतेची जोर धरत आहे. गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे टीम रात्रभर सुरू असलेल्या हॉटेलवर मीडियाचे नजर म्हणून लक्षात ठेवणार आहे. याबाबत सविस्तर अहवाल आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे देणार असल्याचे सांगितले आहे.
तातडीने बैठक घेऊन कडक कारवाईची मागणी
या बेकायदेशीर प्रकारांमुळे भिवंडीतील शांतता धोक्यात आली आहे. नवनिर्वाचित पोलीस उपायुक्तांनी या समस्येची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. उपायुक्तांनी शहरातील सर्व हॉटेलचालकांची तातडीने एक संयुक्त बैठक बोलवावी आणि त्यांना नियम पाळण्याचे कडक निर्देश द्यावेत. जे हॉटेलचालक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.

