Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. आगामी काळात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर पर्यटन विभागाचा भर असुन लवकरच विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी आहे. या दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळचा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ केला. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, एमटीडीसीचे…

Read More

दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नाविन्यपूर्ण नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड एनजीईएल (NGEL) यांच्यात मुंबई येथे संयुक्त उपक्रम करार झाला आहे . या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट 10 गीगावॅट क्षमतेचे रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि अक्षय ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येतील. जेणेकरून राज्याच्या ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार आहे. या संयुक्त उपक्रमाचा एक भाग म्हणून महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड विविध अक्षय ऊर्जा प्रकल्प जसे की ग्राउंड माउंटेड सोलर, फ्लोटिंग सोलर, बॅटरी एनर्जी स्टोरेज, हायब्रीड सोलर, ई. प्रकल्प विकसित करण्यासाठी एकत्र काम…

Read More

दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केले नाही त्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी…

Read More

दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने नवी मुंबईतील तळोजा येथे उभारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या अॅडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन २८ सप्टेंबरला डी.वाय.पाटील विद्यापीठ, नेरूळ येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण.आर. गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष संग्राम देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवोदित वकिलांना कायद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच कायदा विषयावर संशोधन व्हावे, यासाठी अॅडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार…

Read More

दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन मुंबई शहर सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५८ आयोजित करण्यात आला आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणासह निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील…

Read More

दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय जाधव उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग,…

Read More

दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल) आपल्‍या स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून सरकारच्‍या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाप्रती कटिबद्ध आहे. या वर्षी, मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांनी फोक्‍सवॅगन टायगुन एसयूव्‍ही आणि फोक्‍सवॅगन व्‍हर्टस सेदानला एकत्र करत नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक डिझाइन केला आहे. कार संकल्‍पनेला अंतिम रूप देणे, संकल्‍पनांचा संग्रह, बाजारपेठ विश्‍लेषण, संशोधनव विकास, खरेदी, पॅकिंग आणि नऊ महिन्‍यांहून अधिक कालावधीमध्‍ये लाँचसाठी अंतिम कार टेस्टिंग अशा विविध टप्‍प्‍यांमध्‍ये हा प्रकल्‍प राबवण्‍यात आला. विद्यार्थ्‍यांनी विविध पार्टस् डिझाइन व ३डी-प्रिंटींग केले, ज्‍यामधून डिझाइनमधील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी अत्‍याधुनिक उत्‍पादन तंत्रांचा वापर करण्‍याबाबत त्‍यांच्‍या क्षमतेला दाखवले. त्‍यांनी वेईकलला अंडरबॉडी प्रोटेक्‍शन, स्‍टडेड टायर्स, अॅम्बियण्‍ट…

Read More

दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. उद्योगांना मिळणारी सुविधा, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह 2024 मध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे सहभागी झाले होते. यावेळी इंडिया टुडेचे संपादक राजदीप सरदेसाई व कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची विविध विषयांवर मुलाखत घेतली. दावोसमध्ये सुमारे पाच लाख कोटींची गुंतवणूक झाली. याशिवाय सौर ऊर्जा, सेमी कंडक्टर आदी क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढत आहे. नुकतेच नवी मुंबईत सेमी कंडक्टरचा प्रकल्प…

Read More

दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तसेच राऊत यांना न्यायालयाने दंड सुनावताना २५ हजार रुपये ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले. मीरा भाईंदर येथील १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर, मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा…

Read More

दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Read More