दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी तसेच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून ५ पोलिस उप अधिक्षक,१८ पोलिस निरीक्षक,१०४ सहायक निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, १६०४ पोलिस शिपाई यांच्यासह १४५० होमगार्ड,१०३ एनसीसीचे कॅडेट यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आहे. निवडणूका शांततेत आणि निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.जिल्ह्यात एकूण ४ विधासभा मतदारसंघ आहेत.निवडणूकांच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय पोलीस पथकातील ४ तुकड्या क्षेत्रात दाखल झाल्या आहेत.यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांनी सुरू केल्या आहेत. रात्रीच्या वेळेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून गस्ती घातली जात आहे.मागील काही दिवसांपासून पोलिसांनी बेकायदा शस्त्र पोलिसांकडून जप्त केले आहेत. तसेच संवेदनशील मतदारसंघात पोलिसांचा रुट मार्च काढला जात आहे. यामध्ये २४० उमरगा विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,३ पीआय,१७ एपीआय, ३३२ पोलिस शिपाई,३०५ होमगार्ड, १९ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,५ पोलीस वाहने,१४ अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच २० वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. २४१- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,४ पीआय,२३ एपीआय, ३७३ पोलिस शिपाई,३८४ होमगार्ड, ३७ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,५ पोलीस वाहने,२० अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच २६ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. २४२ – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात २ पोलिस उप अधिक्षक, ५ पोलीस निरीक्षक,३० सहाय्यक पोलीस निरीक्षक,४०१ पोलिस शिपाई,३८६ होमगार्ड,२३ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,११ पोलीस वाहने,२४ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,तसेच ३६ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. २४३ – परंडा विधानसभा मतदारसंघात १ पोलिस उप अधिक्षक,४ पोलीस निरीक्षक,३० सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३८८ पोलिस शिपाई,३६७ होमगार्ड,२४ एनसीसी कॅडेट,१ अर्धसैनिक दलाची तुकडी,६ पोलीस वाहने,२६ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,तसेच ३३ वायरलेसच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.तर सीआरओ आणि इतर सुरक्षेमध्ये २ पीआय,४ पोलीस उपनिरीक्षक,११० पोलीस शिपाई,८ होमगार्ड,१४ वाहने २ अतिरिक्त सुरक्षा रक्षक,१६ वायरलेस तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आसियान इंडिया म्युझिक फेस्टिवल २०२४ या महोत्सवात कला सादरीकरणांचा अफलातून मेळ साधला जाणार आहे. भारतातील आघाडीचे कलावंत आणि प्रतिभावान आसियान बॅण्ड्सची सादरीकरणे होणार आहेत, यातून वैविध्यपूर्ण सांगितिक परंपरांचा अनुभव घेण्याची अनोखी संधी रसिकांना मिळणार आहे. मोफत प्रवेश असणारा हा महोत्सव २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून पुराना किल्ला नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. भारतातील संगीत क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय गायकांमध्ये गणना होणारे रघू दीक्षित आणि शान पहिल्या दिवशी कला सादर करणार आहेत. ३० नोव्हेंबरलाही हाच उत्साह कायम राखत उत्साहाने सळसळणारा बॅण्ड वेस्टर्न घाट्स आणि जोरदार जोडी सुकृती-प्रकृती यांची सादरीकरणे होणार आहेत. त्यांच्या शैलींमुळे…
दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- एक भारतीय मल्टीनॅशनल कार्पोरेशन आणि सरकार व नागरिकांसाठी एक प्रमुख विश्वसनीय ग्लोबल टेकनिक-सक्षम सेवा प्रदाता बीएलएस इंटरनॅशनलने ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २५च्या दुस-या तिमाहीत संचालनातून होणारे कंपनीचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २१.४% वाढून ४९५.० कोटी रु. झाले आहे, जे आर्थिक वर्ष २४च्या दुस-या तिमाहीमध्ये ४०७.७ कोटी रु. होते. ही वाढ मुख्यतः व्हिसा आणि कॉन्स्युलर बिझनेसमुळे झाली आहे, ज्याच्या उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २९.६% वाढ झाली आहे. कंपनीचा एबिटा या तिमाहीत वाढून १६४.० कोटी रु. झाला आहे. जो…
दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळतर्फे सरखेल कान्होजी आंग्रे वसाहतीमध्ये शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाव्यवस्थापक मानव संपदा हरळीकर यांसह कर्मचारी व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. या अनुषंगाने कारखान्यातील कामगारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने 192 अलिबाग विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी आरसीएफ…
दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता ‘राज्य निवडणूक आयोगाची तयारी’ याविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. डॉ.…
दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी (मुंबई केंद्र १) साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नीरोड येथे सुरू होत आहे. दिनांक २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२४ दरम्यान हि स्पर्धा होईल. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांचा सहभाग आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह…
दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदानाबाबत आवश्यक तयारी झाली असून मतदानपूर्व काळात आदर्श आचासंहितेचे योग्य पालन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. उल्लंघन झाल्यास तात्काळ गुन्हे नोंदवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान पूर्व 72 तासात करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व निवडणूक निरीक्षक रुही खान, ज्योती मीना, स्वप्नील ममगाई, संतोष कुमार, दुलीचंद राणा, सतीश कुमार, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांसह वरिष्ठ अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी…
दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू७ साठी बुकिंगला सुरूवात केली आहे. नवीन ऑडी क्यू७ ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनच्या माध्यमातून २,००,००० रूपयांच्या सुरूवातीच्या बुकिंग रकमेमध्ये बुक करता येऊ शकते. औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल प्लांट येथे स्थानिक पातळीवर असेम्बल करण्यात आलेली नवीन ऑडी क्यू७ भारतात २८ नोव्हेंबर २०२४ रोजी लाँच करण्यात येईल. ३४० एचपी शक्ती आणि ५०० एनएम टॉर्क निर्माण करणारे शक्तिशाली ३.० लिटर व्ही६ टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी क्यू७ फक्त ५.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करू शकते आणि अव्वल गती २५० किमी/तास आहे.…
दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार…
दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- फेडएक्स कॉर्प.ने आपला वार्षिक इकॉनॉमिक इंपॅक्ट रिपोर्ट प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये २०२४ आर्थिक वर्षात स्थानिक समुदायांत समृद्धी आणण्यामध्ये कंपनीची भूमिका आणि कंपनीचे जगभरात पसरलेले नेटवर्क यांचे विश्लेषण केले आहे. व्यवसाय निर्णय डेटा आणि अॅनालिटिक्सचे अग्रणी प्रदाता डन अँड ब्रॅडस्ट्रीट यांच्याशी सल्लामसलत करून तयार करण्यात आलेल्या या अभ्यासात ‘फेडएक्स इफेक्ट’ अधोरेखित करण्यात आला आहे. भारतातील लक्षणीय योगदानासह जागतिक स्तरावर आर्थिक वृद्धी करणाऱ्या वस्तू आणि कल्पनांच्या प्रवाहाला गती देण्यावर फेडएक्सचा होणारा परिणाम यात दाखवला आहे. फेडएक्सचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमणियम म्हणाले, “आमच्या ग्राहकांची आणि त्यांच्या ग्राहकांची अधिक चांगली सेवा करण्यासाठी आणि त्यायोगे आमची पोहोच आणि…
