दिनांक –२३/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- द बॉडी शॉप या एथिकल व शाश्वत सौंदर्यामधील जागतिक अग्रणी कंपनीने अद्वितीय भारत-प्रेरित कलेक्शन ‘द इंडिया एडिट’ लाँच केले आहे. ही अद्वितीय व उत्साहवर्धक श्रेणी भारत-प्रेरित घटकांच्या संपन्नतेला साजरे करते, ज्याद्वारे विशेषत: ‘ओन्ली इन इंडिया, फॉर यू’चा संदेश देते. द इंडिया एडिटमध्ये भारताचे सेलिब्रेशन म्हणून लोटस, हिबिस्कस, पॉमेग्रेनेट आणि ब्लॅक ग्रेप या चार विचारपूर्वक डिझाइन केलेल्या कलेक्शन्सचा समावेश आहे. द बॉडी शॉपच्या एथिकल ब्युटीप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत हे कलेक्शन्स वेगन, पॅराबेन-मुक्त आणि डर्माटोलॉजिकली चाचणी केलेले आहेत, तसेच ९० टक्क्यांहून अधिक नैसर्गिक घटक व आयएफआरए-प्रमाणित फ्रॅग्रॅन्सेससह डिझाइन करण्यात आले आहेत ज्यामधून उत्साहवर्धक सुगंधाचा अनुभव…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२३/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- तालुक्यातील नावाजलेल्या संस्थेतील एका गावात इंग्रजी माध्यमाच्या सी बी एस सी शाळेत शिक्षकांची मानसिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याने शिक्षक व कर्मचारी तणावाखाली काम करत आहे. शाळेतील मुख्याध्यापक व संस्था चालक प्रत्येक गोष्टीत शिक्षकांना मानसिक त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. शालेय कामकाजाचे अतिरिक्त ओझे शिक्षकांवर पडत असून कोणालाही आपले मत व्यक्त करण्यास येथे स्वातंत्र्य नाही. मी म्हणेल तोच कायदा आणि मी सांगेल तीच पूर्व दिशा असे प्रकारचे वातावरण शाळेत तयार झालेले आहे. वैयक्तिक कामासाठी किंवा आजारी असल्यास हक्काच्या रजा सुद्धा वेळेवर भेटत नसून कोणी काही बोलल्यास कामावरून काढण्याचे धमक्या येथील कर्मचारी व…
दिनांक –२३/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- टीमलीझ सर्व्हिसेस ही भारतातील एक आघाडीची लोक पुरवठा साखळी कंपनी आहे. या कंपनीने टेलिकॉम क्षेत्रावरील आपले अलीकडचे मूल्यांकन प्रकाशित केले आहे, ज्यामध्ये वाढत चाललेल्या ब्रॉडबॅन्ड क्षेत्राची लक्षणीयता स्पष्ट दिसून येते. टेलिकॉम क्षेत्रातील वाढ मंद असली, तरी हाय-स्पीड इंटरनेटची आणि डेटा-चालित सेवांची वाढती मागणी यामुळे ब्रॉडबॅन्ड मार्केटमध्ये येत्या काही वर्षांत ९-१०% कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट दिसण्याची आशा आहे. सध्या भारतात वायर्ड ब्रॉडबॅन्डचा प्रसार सुमारे १३% आहे. प्रति यूझर उच्च सरासरी उत्पन्नामुळे सेवा प्रदाते पारंपरिक मोबिलिटी उत्पादनांपेक्षा ब्रॉडबॅन्ड सेवांना प्राधान्य देत असल्याने हा प्रसार आणखी वाढणे अपेक्षित आहे. ब्रॉडबॅन्ड सेवांच्या विस्तारामुळे केवळ कनेक्टिव्हिटीच वाढत नाही…
दिनांक –२२/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधाउपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. आज जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पडण्याच्या सूचना दिल्या. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात आवश्यक औषध साठ्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. …
दिनांक –२२/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जसे महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना रोज शेकडो घडतात, तसे आजच्या घडीला पुरुषांवरील अन्यायाच्या घटना पाच-पन्नास घडतात, हेही वास्तव आहे. त्यामुळे पुरुषांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये पुरुष हक्क संरक्षण समिती कार्यरत आहे. वर्षभरात प्रत्येक जिल्हा कार्यालयात २५०० तक्रारी दाखल होतात. रोज किमान ४०० ते ५०० जण नाव न सांगता किंवा खोटे नाव सांगून त्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाची तक्रार सांगून सल्ला विचारतात अशी माहिती अशी माहिती पुरुष हक्क संरक्षण समितीचे ॲड. बाळासाहेब पाटील, ॲड. धर्मेंद्र चव्हाण यांनी दिली असून पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन दि. २९ डिसेंबर रोजी धुळे येथे होणार…
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रसिद्ध मराठी निर्देशक विकी कदम यांनी जहांकिल्ला या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण केले आहे, जो साहस, एकता आणि सशक्तीकरणाचा उत्सव साजरा करतो. एसवीपी फिल्म्सच्या सहकार्याने हाउज़ैट प्रोडक्शंस लिमिटेड द्वारा निर्मित, या चित्रपटात जोबनप्रीत सिंग आणि गुरबानी गिल प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिक प्रवासात घेऊन जाण्याचे वचन देतो, प्रथम प्रतिसाद देणारे आणि समाज सुरक्षित ठेवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या नायकांच्या अथक प्रयत्नांवर प्रकाश टाकतो. हे तरुणांची शक्ती आणि एक मजबूत, एकसंध राष्ट्र घडवण्यात महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवरही प्रकाश टाकते. चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विकी कदम म्हणाले, “जहांकिल्ला हा केवळ चित्रपट नाही; हा एकता, धैर्य आणि…
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- लिव्हप्युअर या भारतातील आघाडीच्या ग्राहक-केंद्रित ब्रँडने दुसऱ्या तिमाहीतील प्रभावी निकालांची घोषणा केली आहे, जेथे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुस-या तिमाहीत महसूलामध्ये ५० टक्के वाढीची नोंद केली आहे. नाविन्यपूर्ण उत्पादन लाँचेस, धोरणात्मक विपणन गुंतवणूका आणि सणासुदीच्या काळात सुरूवातीपासून झालेली वाढ या बाबींना या वाढीचे श्रेय जाते. कंपनीचे व्हॅल्यू इंजीनिअरिंग व परिवर्तनामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांचे फळ मिळत आहे, ज्यामुळे लिव्हप्युअरला बाजारपेठेत अग्रगण्य स्पर्धात्मक स्थान मिळाले आहे. विविध विभागांमध्ये प्रबळ कामगिरीमुळे दुस-या तिमाहीत लिव्हप्युअरच्या वाढीला गती मिळाली, जेथे जनरल ट्रेड महसूलाने प्रभावी ५५ टक्के वाढ केली. ई-कॉमर्स व जनरल ट्रेडने एकत्रित ६६ टक्के वाढीची नोंद केली, तर…
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2), 986 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3), 734 चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी एकूण 2 हजार 453 अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 188-पनवेल अे.आर.कालसेकर पॉलिटेक्नीक कॉलेज,पनवेल, ठाणा नाका जवळ, कर्नाळा स्पोटर्स ॲकेडमी समोर, पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 24 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 25 आहे. मतमोजणी पर्यवेक्षक 38, मतमोजणी सहाय्यक 38, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 38, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 45, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 310, चतुर्थ…
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आज ऑस्ट्रेलिया-स्थित सर्वसमावेशक शिक्षण सेवा प्रदाता प्लॅनेट एज्युकेशन ऑस्ट्रेलिया पीटीवाय लि.च्या संपादनाला मान्यता मिळाल्याची घोषणा केली, जेथे ४९ टक्के देय भरलेल्या शेअर भांडवालाची धोरणात्मक गुंतवणूक करण्यात आली आहे. ही धोरणात्मक गुंतवणूक इझमायट्रिपच्या आंतरराष्ट्रीय स्टडी टुरिझममधील प्रवेशाला सादर करते आणि पर्यटन क्षेत्रातील त्यांच्या स्थानाला अधिक दृढ करते. १९९९ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या प्लॅनेट एज्युकेशनने आघाडीची शिक्षण सेवा प्रदाता म्हणून स्वत:चा दर्जा स्थापित केला आहे, तसेच उद्योगामध्ये २५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. कंपनी परेदशात शिक्षण घेण्याच्या सर्वसमावेशक सेवा देते, ज्यामध्ये तज्ञांसोबत समुपदेशन, युनिव्हर्सिटी प्लेसमेंट्स…
दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाजवळ (एमआयडीसी) कारखान्याला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावरील व्हिज्युअलमध्ये कारखान्यातून धुराचे प्रचंड लोट उठत असल्याचे दिसून आले. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.
