पार्ले महोत्सव २०२४ ची चाहूल; २१ डिसेंबरपासून शानदार आयोजन महोत्सवातील सहभागासाठी स्पर्धकांची नावनोंदणी सुरु
दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- केवळ पार्लेकरच नव्हे तर संपूर्ण मुंबई परिसरातील सांस्कृतिक, क्रिडा, कला क्षेत्राचे आकर्षण असलेल्या बहुप्रतिक्षित पार्ले महोत्सव २०२४ आमदार पराग अळवणी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली विलेपार्ले येथे २१ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत होत आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष असून या महोत्सवाची रौप्यमहोत्सवी वाटचाल अधिक जोमाने सुरु आहे.
या महोत्सवात विविध वयोगटात वैयक्तिक आणि सांघिक अशी सुमारे ३५०० पारितोषिके असून ६० हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा प्राथमिक अंदाज आहे. साठ्ये महाविद्यालय संकुल, दुभाषी मैदान तसेच विविध ठिकाणी त्याचे आयोजन होत असून संपूर्ण विलेपार्ले परिसरात या कालावधीत महोत्सवाचे वातावरण दिसून येणार आहे तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरदेखील उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत असून नावनोंदणी तसेच इतर नियोजन सुरु झाले आहे. या महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी तसेच सहभागासाठी पार्ले महोत्सव २०२४ चे फेसुबक, एक्स, इन्स्टाग्राम, युट्युब बरोबरच २, अंबर पॅलेस, चित्तरंजन मार्ग, विलेपार्ले (पूर्व) येथे किंवा दूरध्वनी ९०८२०७८९६८, ०२२-२६१३६५१३, २६१७७१२५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
महोत्सवातील स्पर्धा पुढीलप्रमाणे – क्रीडा – क्रिकेट, कबड्डी, व्हॉली बॉल, मल्लखांब, बॉक्स क्रिकेट, शरीर सौष्ठव, फुटबॉल, रस्सीखेच, बुद्धीबळ, कॅरम, गोळाफेक, योगा, धावणे, स्लो सायकलिंग, वेट लिफ्टिंग, स्केटिंग, पिकल बॉल, मेन्स फिजिक्स फिटनेस, दहीहंडी, कला – चित्रकला, रांगोळी, मेहंदी, हस्ताक्षर, सांस्कृतिक – समूह नृत्य, नृत्य (एकल), नृत्य (जोडी), मराठी आणि हिंदी गायन, कराओके पुरुष, महिला तसेच युगुल गायन, विशेष – सदृढ बालक, होम मिनिस्टर, श्लोक पठण, प्रश्न मंजुषा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा.