दिनांक –०१/०२/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वाडा तालुक्यात टायर जाळणाऱ्या अवैध कंपनीत स्फोट झाला यात पाच लोक गंभीर जखमी तर दोन बालक मयत झाले आहेत. या अवैध कंपन्यांना आशीर्वाद कोणाचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी  व  औद्योगिक आरोग्य संचालनालय सुरक्षा या विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी- अनिल महाजन,वरिष्ठ पत्रकार मंत्रालय विधिमंडळ. अध्यक्ष, पर्यावरण सामाजिक चळवळ.

जिल्हा-पालघर, तालुका-,वाडा, –वडवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये एम डी पायरोलिसेस या कंपनीत बुधवारी सायंकाळी ०६ वाजता बॉयलर तथा रिऍक्टरचा स्फोट झाला. त्यात अंदाजे एकूण पाच जण जखमी झालेत. त्यापैकी दोन बालक (कामगाराची मुले ) हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल असताना मृत्युमुखी झाले आहेत.

या घटनास्थळी तात्काळ समाजसेवक व मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार, अनिलभाऊ महाजन यांनी भेट दिली व स्थानिक पोलिसांची तसेच संबंधित पर्यावरण विभागाच्या संचालक ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टीच्या औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचनालयाच्या सहसंचालक श्री.टोटावडे, स्थानिक अधिकारी श्री. मोहिते, तसेच प्रदूषण मंडळाचे अधिकारी श्री.राजपूत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व घटनेची माहिती घेतली.

वाडा येथे टायर जाळून तेल काढण्याच्या व टायर मधील तारा काढण्याच्या एकूण अंदाजे ३० ते ३५ कंपन्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यामध्ये लक्षात आली आहे. MPCB अधिकाऱ्यांनी कुठलीही नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या कंपन्यांना मान्यता दिली आहे. परंतु MPCB ची मान्यता असून चालत नाही तर बॉयलर रिऍक्टर औद्योगिक सुरक्षा विभागाकडे कंपनी रजिस्टर करावी लागते. या विभागात “एमडी पायरोलिसेस” नावाची स्फोट झालेली कंपनी ही रजिस्टर नाही अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.  म्हणजे सदर कंपनी मध्ये असलेले (बॉयलर रिऍक्टर) हे अनधिकृत आहे. स्थानिक पोलिसांकडून माहिती मिळाली की तपास सुरू आहे.  अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नाही लवकरच आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल करू अशी माहिती स्थानिक पोलीस स्टेशनचे एपीआय साबळे साहेब यांनी दिली.

श्री. अनिल महाजन वरिष्ठ पत्रकार ,मंत्रालय विधिमंडळ यांनी वाडा येथे काही शेतकऱ्यांची संवाद साधला त्यांचे दुःख जाणून घेतले.  *त्या कंपन्यांचा कुठलाही “ईटीपी प्लांट” नाही वेस्ट मॅनेजमेंटचे हे लोक सदस्य नाहीत. सर्व दूषित पाणी आजूबाजूच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होत आहे.  शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही. MPCB यांनी तापमान (Temperature) चेक करण्याची एक व्हॅन सदर ठिकाणी लावली आहे. परंतु सदर सर्व कंपन्या सद्यस्थितीत बंद ठेवले आहेत.  त्यांच्या चिमणी मधून धूर येत नाही तर तापमान (Temperature) कसे चेक होणार.  MPCB चे संबंधित सर्व अधिकारी तसेच बॉयलर रिऍक्टर चे अधिकारी या सर्व कंपन्यांकडून दरमहा हप्ता घेतात असे यावेळी येथील गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाखाली लोकांचे जीव घेणाऱ्या टायर कंपन्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.याबाबत अनिल महाजन हे लवकरच या गंभीर विषयाची काही आमदारांच्या मार्फत आगामी अधिवेशनात लक्षवेधी लावण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत.  तसेच पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्याचे निवेदन देणार असल्याचे सांगितले.  या ठिकाणावरील अजून काही टायरच्या कंपन्या आहेत त्यामधूनही आगामी काळात अशाच प्रकारची घटना होऊ शकते त्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share.