दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  वर्ष होतं 2022. अचानक ओद्योगिक जगतात खळबळ उडाली. 55 वर्षांपासून भारतातील पॅकेज्ड वॉटर मार्केटवर राज्य करणाऱ्या बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी जाहीर केले की त्यांना त्यांचा व्यवसाय विकायचा आहे. ते म्हणाले की, वाढत्या वयामुळे ते व्यवसायाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत आणि त्यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान हिला बिस्लेरी व्यवसायात विशेष रस नाही, त्यामुळे त्यांना हा व्यवसाय विकावा लागणार आहे. रतन टाटा यांच्या कंपनीने बिस्लेरी विकत घेण्यासाठी 7000 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण ही ऑफर 42 वर्षीय जयंतीने फेटाळून लावली होती.
Share.