दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने सायंकाळी आगमन झाले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार आशीष शेलार, ॲडमिरल अनिल जग्गी, मेजर जनरल विक्रमदिप तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.