दिनांक – ०२/०६/२०२६ मुंबई , गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ओबीसी जनक्रांती परिषदेची नवीन राज्य कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई येथे जून २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ओबीसी जनक्रांती परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अनुषंगाने संघटनेची नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील १८ पगड जाती व १२ बलुतेदार ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ओबीसी जनक्रांती परिषदेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ओबीसी नेते तथा ओबीसी जनक्रांती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आगामी काळात संघटन बांधणी, ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवरील आंदोलने, मोर्चे तसेच समाजहिताचे विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सर्व इच्छुक कार्यकर्ते, समाजबांधव आणि युवकांनी संघटनेच्या कार्यात सहभागी व्हावे. संघटनेत तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी तसेच विविध जबाबदाऱ्यांसाठी नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

समाजासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या युवकांनी आपले नाव, पत्ता, जिल्हा, तालुका व संपर्क माहिती खालील क्रमांकावर संपर्क : 8788964050 पाठवावी तसेच आगामी राज्यस्तरीय बैठकीस उपस्थित राहावे आवाहन प्रदेश समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.