दिनांक :-१३/०८/२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,अंबरनाथ :- अंबरनाथ येथील गुरुशेकरन मुदलियार (वय ६८) यांची MH 05 CR 7730 क्रमांकाची दुचाकी दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाबाहेरून चोरीला गेली.या घटनेची माहिती त्यांचे जावई निखिल लक्ष्मण बिजवे यांना मिळताच त्यांनी तात्काळ अंबरनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावेळी त्यांचे मित्र अब्दुल अन्सारी हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
तक्रार मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दुचाकीचा शोध सुरू केला. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या २० ते २५ मिनिटांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून काढण्यात यश आले.
अंबरनाथ पोलिसांच्या या जलद, तत्पर आणि कौतुकास्पद कारवाईचे नागरिकांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. 🚔👏

