दिनांक :-०६/०८/२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी शहरात अवैध डाईंगचे वाढते प्रदूषण कल्याण,कोनगाव,भिवंडी,उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर, टिटवाळा येथे असलेल्या अवैद्य जीन्स फॅक्टरी मधून मोठ्या प्रमाणात अस्तित्वात कल्याण प्रदूषण विभाग सुस्त.
अवैध जीन्स व डाईंग कारखान्यांवर कडक कारवाई करा; ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशनची पर्यावरण मंत्री, पंकजाताई मुंडे यांच्याकडे मागणी.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, कोनगाव, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा परिसरातील गल्लोगल्ली सुरू असलेल्या अवैध जीन्स आणि डाईंग कारखान्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ०४/०८/२०२६ रोजी ‘ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशन’ या राष्ट्रीय अशासकीय संस्थेचे चेअरमन श्री. अनिलभाऊ महाजन यांनी मंत्रालयात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुस्त कारभारावर नाराजी
भिवंडी शहरासह ग्रामीण भागात उघड्यावर चालणाऱ्या या अवैध जीन्स कारखान्यांमुळे स्थानिक पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुस्त आणि दुर्लक्षित कारभाराबाबत श्री.अनिलभाऊ महाजन यांनी पर्यावरण मंत्र्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रमुख मागण्या:
• भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा येथील सर्व अवैध जीन्स व डाईंग कारखान्यांवर तात्काळ बंदी घालून कायदेशीर कारवाई करावी.
• कल्याण प्रदूषण कार्यालयातील वाढता कामाचा ताण विचारात घेता तिथे FO (Field Officer) आणि SRO (Sub-Regional Officer) या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या तात्काळ वाढवण्यात यावी.
निष्काळजी अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई
याप्रकरणी तक्रार व निवेदन स्वीकारल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ठाणे जिल्ह्यातील अवैध कारखान्यांवर लवकरच कडक मोहीम राबवून धडक कारवाई केली जाईल, तसेच अशा अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन पर्यावरण मंत्री, पंकजाताई मुंडे त्यांनी दिले

