दिनांक – १७/०३/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-दिनांक २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० जळगाव येथे ओबीसी -बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्राचा ओबीसी-बहुजन समाजाचा मेळावा संपन्न होत आहे. सदर ओबीसी महामेळाव्याला ओबीसी नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.छगनराव भुजबळ साहेब हे प्रमुख उपस्थिती असणार आहे. ओबीसी महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातील सर्व माळी पंचम मंडळ तसेच तालुकास्तरीय सर्व बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या सर्व संघटना व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवायची आहे. बहुजन समाजासाठी लढणारे आपले नेते छगनराव भुजबळ साहेब यांना ताकद देण्यासाठी व यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सर्वांनी ओबीसी महामेळाव्याला आपली उपस्थिती द्यायची आहे. असे आहवान महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन उत्तर महाराष्ट्रातील माळी समाजाला व बहुजन समाजाला आव्हान केले आहे. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ओबीसी महामेळाव्याला उपस्थित रहावे.

Share.