दिनांक – २६/०५/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार मानले जाते. भिवंडी शहर हे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक व व्यापार उद्योगाचे केंद्र म्हणूनओळखले जाते. परंतु भिवंडी शहरांमध्ये महापालिकेचा अतिशय गलथान व भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नको त्या लोकांचा राजकीय हस्तक्षेप व भ्रष्टाचाराने भरभटलेले अशिक्षित काही अधिकारी व कर्मचारी वर्ग त्यांच्यामुळे भिवंडी महानगरपालिका ओळख ही “ड” वर्गाच्या महापालिकेत गणना केली जाते.

प्रभाग क्रमांक ०१,०२,०४ या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम सुरू आहे. नियमाचे बिनधास्तपणे उल्लंघन केले जात आहे. कायदा धाब्यावर बसून हे लोक काम करत आहेत. तसेच प्रभाग क्रमांक .०३ व ०५ या ठिकाणी ही लक्ष घालणे गरजेचे आहे. भिवंडी शहर महापालिकेतील काही अशिक्षित अधिकारी व कर्मचारी वर्ग अनधिकृत व अधिकृत बांधकाम वर चुकीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात काम करताना दिसून येत आहेत.

भिवंडी शहरातील ज्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले जात आहे. त्या जागा मालकावर भिवंडी महानगरपालिका एम.आर.टी.पी (MRTP) कार्यवाही करते. मात्र बिल्डिंग दुर्घटना झाली तर त्या बिल्डरवर गुन्हा दाखल होतो आणि जागा मालक यांना सोडले जाते. असा उलट कारभार भिवंडी महानगरपालिका करते. परंतु जे लोक डेव्हलपर छोटे-मोठे ठेकेदार बिल्डर आहेत.त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. सामान्य जनतेची मागणी आहे. जे अवैध बांधकाम करणारे बिल्डर आहेत छोटे-मोठे ठेकेदार आहेत. त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे तसेच डी.पी.एल प्रमाणे महापालिकेत अवैध बांधकामावर कार्यवाही करताना दिसत नाहीत. प्रत्येक प्रभागातील प्रभाग अधिकारी ,इंजिनियर, काही अशिक्षित कर्मचारी दररोज संध्याकाळी अवैधपणे मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करणारा ठेकेदाराकडून पिशवी भरून पैसे घरी घेऊन जातात. अशी सूत्रांची खात्रीशीर माहिती आहे. हे भिवंडी महानगरपालिका आयुक्त श्री.अनमोल सागर यांच्या कधी लक्षात येईल का? की यांच्या लक्षात आले आहे. प्रभाग अधिकारी यांच्यासोबत आयुक्तांची मिली जुली भगत तर नाही ना. अशी चर्चा दबक्या आवाजात भिवंडी शहरात होत आहे.


भिवंडी शहरात उठून-सुटून कोणीही ठेकेदार बिल्डर बनत आहे. चार लोक एकत्र आले की कंस्ट्रशन काम करत आहेत. त्यांच्याकडे पात्रता नाही कुठलीही टेक्निकल टीम नाही पालिकेचे अनधिकृत लायसन्स नाही. नगररचना विभागाचे नोंदणी पत्र नाही.अशा अवैध बांधकाम करणाऱ्या ठेकेदार इतरांना काही भ्रष्टाचारी अधिकारी पाठिंबा देत आहेत. त्यामुळेच अवैध बांधकाम करणाऱ्यांचे रॅकेट भिवंडी शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला जबाबदार प्रभागातील प्रभाग अधिकारी व संबंधित अधिकारी आहेत.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे टीम भिवंडी शहरात प्रत्येक प्रभागांमध्ये अनधिकृत बांधकामांचा व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करणार आहे. अवैध बांधकामाचे सर्व व्हिडिओ काढून तसेच सविस्तर अहवाल तयार करून नगर विकास मंत्रालय व प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे सादर करणार असल्याचे श्री.अनिलभाऊ महाजन मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तसेच गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक यांनी त्यावेळी बोलताना सांगितले.

गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे टीम संपूर्ण पाचही प्रभागाचा सर्व्हे करणार आणि सविस्तर प्रभागनिहाय अवैध बांधकामाची यादी संपूर्ण पाठपुराव्यासह फोटोग्राफसह अवैद्य बांधकामाची पडताळणी करून एक-एक वृत्त प्रकाशित करणारा व लेखी तक्रार नगरविकास मंत्रालय यांच्याकडे करणार.

Share.