दिनांक – २०/०५/२०२६ जळगाव, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भडगाव,पाचोरा,जामनेर या तिन्ही तालुक्यांमध्ये बेकायदेशीर पणे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. शेकडो ट्रक भरून बेकायदेशीर रित्या लाकूड वखारी मध्ये जात आहे.बेकायदेशीर लाकूड घेणाऱ्या वखारीवर ताबडतोब कारवाई करावी. तसेच बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रीन इंडिया पॉल्युशन कंट्रोल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तसेच गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे मुख्य संपादक श्री.अनिलभाऊ महाजन मुंबई यांनी वनमंत्री श्री.गणेश नाईक यांच्याकडे मागणी केली आहे.अशा मागणीचा ई-मेल यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे.

पाचोरा,भडगाव,जामनेर या ठिकाणी असलेल्या वखार ज्या ठिकाणी अवैध लाकूड कटिंग केली जाते या सर्व वखारांची स्थानिक प्रशासनामार्फत तसेच वन अधिकाऱ्यांच्या मार्फत काटेकरपणे चौकशी करून बेकायदेशीर लाकूड कटिंग करणाऱ्या वखार चालकांवर कारवाई करावी व सदर वखार बंद करण्यात यावी.
जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, भडगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड फॉरेस्ट विभागाचे अधिकारी कुंभ करण्याच्या झोपेत.
पाचोरा,भडगाव,जामनेर या ठिकाणच्या वखारीची तात्काळ चौकशी करून वखारी बंद करण्याची मागणी. पाचोरा,भडगाव,जामनेर या ठिकाणी शासनाच्या पडीत जमिनीवरती तसेच अनेक शेतात बेकायदेशीर वृक्ष कटिंग करून थप्पा मारून ठेवलेला आहे.सर्व लाकडांची तपासणी करून सदर लाकडे शासनाने ताब्यात घ्यावे.

