दिनांक – २७/०४/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वरिष्ठ पत्रकार ,मुख्य संपादक गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल श्री.अनिल महाजन, मुंबई यांनी भिवंडी ट्राफिक पोलिसांन बाबत तसेच अनधिकृत ट्राफिक वार्डन नेमणुकी बाबत गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे व लवकरच या विषयावर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांची मुलाखती घेणार आहे.

भिवंडीत वाहनधारकांना दंड न ठोकता आर्थिक देवाण-घेवाण करून गाड्या सोडण्यात येत आहे. भिवंडी शहरात ट्राफिक पोलिसांचा खाजगी पंटरावर जोर. वार्डन बंदी असताना वार्डन का ? ठेवण्यात येत आहे. भिवंडी ट्राफिक पोलिसांनी बेकायदेशीर खाजगी वार्डन नियुक्त केलेले आहे. अशी सूत्रांची माहिती आहे

भिवंडी शहर ट्राफिक पोलीस वाहनधारकांना पकडतात त्यांचे वाहन साखळीमध्ये अडकवतात किंवा क्रेन ने टोईंग करून आणतात. तसेच त्या वाहनांवर कुठलेही ऑनलाईन फाईन मारत नाही. पैसे घेऊन ते वाहन सोडून देत असतात अशी माहिती मिळत आहे. उदाहरण म्हणून मी खालील आपल्याला एक बाईक दाखवत आहे. सदर बाईक ट्राफिक पोलिसांनी पकडलेली आहे. साखळी लावलेली आहे. दिनांक ०९/०४/२०२६ रोजी दुपारी सुमारे ०२:४३ वाजता पाईपलाईन परिसरात होंडा शाईन (काळ्या रंगाची) MH04 MV 0273 क्रमांकाची मोटरसायकल ट्राफिक पोलिसांनी पकडून साखळीने अडकवून ठेवली होती. सदर मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तीकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही, त्याच्यावर लायसन्स नसल्याबाबत कोणताही अधिकृत दंड आकारण्यात आलेला नाही तसेच ऑनलाईन प्रणालीमध्येही कोणताही दंड नोंदवलेला दिसत नाही. गाडीचे कागदपत्र हि पूर्ण होती .

तसेच, मोटरसायकल जप्त केल्यानंतर सुमारे दोन तासांनी संबंधित वाहन धारकाकडून एटीएमद्वारे रुपये १०००/- काढून घेतल्याचे निदर्शनास आले असून, त्यानंतर कोणतीही अधिकृत पावती न देता वाहन सोडण्यात आले. सदर कारवाई ट्राफिक पोलीस कर्मचारी श्री. सुनील पाटील (बक्कल क्रमांक १२३४) यांनी केली असल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना केवळ एक उदाहरण असून, अशा प्रकारे दररोज शेकडो वाहनधारकांकडून बेकायदेशीर रक्कम वसूल करून कोणतीही अधिकृत दंड प्रक्रिया न करता वाहने सोडली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

हे एक उदाहरण झाले असे अनेक उदाहरण शेकडो गाड्या रोज भिवंडी शहरात पकडण्यात येतात आणि सोडण्यात येतात .याला जबाबदार ट्राफिक विभाग आहे ट्राफिक विभागातील वरिष्ठ अधिकारी व पंकज शिरसाठ,पोलीस उपायुक्त ठाणे ट्राफिक तसेच अप्पर पोलीस महासंचालक ट्राफिक विभाग हे या मध्ये लक्ष घालतील का ? अशी स्थानिक जनतेचे मागणी आहे.

रात्रभरात भिवंडी शहरात लोखंड भरून येणाऱ्या सर्व गाड्या तसेच कोयला व लाकडाच्या वाहनां कडून ट्राफिक पोलीस खाजगी वार्डन मार्फत बिंदास पैसे घेत असतात. खाजगी वार्डन आणि लोकांकडून वसुली करत आहेत. यांना कोणी अधिकार दिले आहेत. या बाबत वरिष्ठानी माहिती घ्यावी.

रात्री अपरात्री अनेक छोटे-मोठ्या वाहनांकडून तसेच अवजड वाहनांकडून रात्रभरात भिवंडी शहरात लोखंड भरून येणाऱ्या सर्व गाड्या तसेच कोयला व लाकडाच्या वाहनांकडून ट्राफिक पोलीस खाजगी वार्डन मार्फत बिंदास पैसे घेत असतात. खाजगी वार्डन फक्त ब्रिज बनवण्याचे काम सुरू असताना तात्पुरता ठेवण्यात आले होते. परंतु अजूनही ते वार्डन काही ठिकाणी दिसत आहेत. आणि लोकांकडून वसुली करत आहेत. यांना कोणी अधिकार दिले आहेत. या बाबत वरिष्ठानी माहिती घ्यावी. मोठ्या प्रमाणात खाजगी वार्डन मार्फत काही भिवंडीत पोलिसांची वसुली सुरू आहे. त्यावर आता आमची नजर आहे व गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाची टीम वृत्त संकलनासाठी काम करत आहे. लवकरच सविस्तर पुराव्यानिशी व्हिडिओ माहिती आम्ही गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडे सादर करणार आहोत.

ट्राफिक पोलीस कर्मचारी श्री. सुनील पाटील (बक्कल क्रमांक १२३४) यांनी पकडलेली मोटर सायकलचा जी.पी.एस फोटो, वेळ व बाईकला साखळी अडकवलेला फोटो तसेच ए.टी.म मधून काढून दिलेले एक हजार रुपये त्याची पावती याचा जी.पी.एस फोटो सोबत जोडत आहे.

Share.