दिनांक –०५/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ( मुंबई केंद्र २ ) मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, चर्नीरोड, मुंबई येथे सुरू होत आहे. दिनांक ६ ते १८ डिसेंबरच्या दरम्यान ह्या स्पर्धा होतील. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण १७ संघांचा सहभाग आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.
Breaking
- भिवंडी बायपासला बेकायदेशीर लॉजिंग-बोर्डिंग आणि अनधिकृत डान्स बारचा विळखा; वरिष्ठ पत्रकार व समाजसेवक अनिलभाऊ महाजन यांचा पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे कारवाईचा इशारा.
- साक्री-धुळे महामार्गावरील ढाब्यांवर अवैध केमिकल व गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा; प्रशासनाविरोधात संताप, तात्काळ कारवाईची मागणी
- विटा येथे तब्बल ४२ लाखांचे ‘एम.डी.’ ड्रग्ज जप्त ,सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व विटा पोलिसांची धडक कारवाई, केरळ कनेक्शन उघड.
- महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालतीचे खानापूर तालुक्यात आयोजन महसुली दाव्यांचा सामंजस्याने व तडजोडीने जलद निपटारा करण्याची सुवर्णसंधी
- उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री,माळी समाज बांधव श्री.केशव प्रसाद मोर्य यांची महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.अनिल महाजन यांनी घेतली भेट लखनऊ येथे.
- मांजर्डे-नरसेवाडी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन ग्रामीण विकासासोबत क्रीडा सुविधांनाही प्राधान्य : आमदार सुहास बाबर
- लखनऊ में अति पिछड़ा जातीय महा मेला हुवा संपन्न.
- लखनऊ मध्ये अति मागासवर्गीय महामेळावा संपन्न

