दिनांक –०५/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ( मुंबई केंद्र २ ) मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, चर्नीरोड, मुंबई येथे सुरू होत आहे. दिनांक ६ ते १८ डिसेंबरच्या दरम्यान ह्या स्पर्धा होतील. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण १७ संघांचा सहभाग आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.
Breaking
- आई-वडिलांना घडविले नेपाळ काठमांडू येथील श्री पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन
- ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनच्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; प्रदूषण हाय पॉवर कमिटीला आवश्यक कारवाईचे निर्देश.
- ठाण्यात अवैध ऑनलाईन लॉटरी जुगाराचा सुळसुळाट:- गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या टीमचा आज ठाण्यात सर्व्हे. सर्व्हे मधून खळबळजनक खुलासा .
- ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या ०१ ते ०५ परिमंडळामध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर गोरगरिबांचे संसार उध्वस्त.
- प्रदूषणमुक्त आणि हरित महाराष्ट्रासाठी “ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रण फाउंडेशन”चे रणशिंग; बेकायदेशीर कारखाने, वृक्षतोड व प्रदूषणाविरोधात तीव्र लढा!
- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल’ सज्ज; MPCB आणि पर्यावरण मंत्रालयाला मिळणार राज्यभर तांत्रिक मदत.
- अवैध जीन्स फॅक्टरींना आशीर्वाद देणाऱ्या MPCB अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि कल्याण कार्यालयात तातडीने कर्मचाऱ्यांची भरती करा.
- अंबरनाथ पोलिसांची तातडीची कारवाई; २० ते २५ मिनिटांत चोरीची दुचाकी हस्तगत!

