दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभेमध्ये आपले म्हणणे मुद्देसूदपणे तसेच संसदिय पद्धतीने पण प्रभावी पणे मांडणाऱ्या आमदरांपैकी पराग अळवणी एक असल्याने त्यांना सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला असे उद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी काढले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल, लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले तर्फे आयोजित, पराग अळवणी यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.एक अभ्यासू आमदार निवडून दिल्याबद्दल त्यांनी पार्लेकरांचे आभार मानले.
विधानसभा हे अत्यंत प्रभावी व्यासपीठ असून तेथे प्रश्न धसास लावता येतात याची अनेक उदाहरणे देत, मतदारसंघाच्या तसेच मुंबईच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला असे प्रतिपादन आमदार पराग अळवणी यांनी केले.एखादा प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्याचा असल्यास तो विविध मार्गांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न करायचा, कधी ना कधी बोलायची संधी मिळतेच असे त्यांनी सांगितले. उदाहरणार्थ, विमानतळ फनेल झोन मधील इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न ४२ वेळा तारांकित प्रश्न,लक्षवेधी,प्रस्ताव,ठराव,विधेयकावरील चर्चा द्वारे मांडण्याचा प्रयत्न केला तर १२ वेळा प्रत्यक्ष बोलायला मिळाले.
यानिमित्ताने, पराग अळवणी यांच्या विधानसभा अधिवेशनातील कार्याचा अहवाल राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला.या अहवालाचे वैशिष्ट्य असे की QR कोड च्या माध्यमातून विधानसभेतील सुमारे १२५ भाषणांचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत.
लोकप्रतिनिधींनी बदल घडवून आणणे महत्वाचे असते आणि त्यासाठी त्यांच्या कडून प्रभावी काम होते तेव्हा लोकांनी त्यांचे कौतुक केले पाहिजे या भावनेतून संस्थेने हा सत्कार सोहळा आयोजित केला असे लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी सांगितले.
Breaking
- शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का? पंढरपुरातून भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, विधानसभेचे रणशिंग फुंकले!
- सुरांच्या जादुगारीचा अंत: ‘महाराष्ट्र भूषण’ आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी दुःखद निधन!
- पत्नी कुठेय हे देवालाच ठाऊक!’; भोंदूबाबा अशोक खरातच्या उत्तराने पोलीसही चक्रावले, आज कोर्टात हजर करणार
- बारामती विमानतळावर भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक घटनाक्रम
- गणेश जयंतीनिमित्त बांबवडेत कार्यक्रम उत्साहात संपन्न.
- मंगलदास मार्केट,काळबादेवी मध्ये बेकायदेशीर क्रॅश लॉटरी व कच्चा चिठ्ठीचे दुकाने थाटली.
- मेंदूच्या आजाराने ग्रस्त १७ वर्षीय तरुणीचा रुग्णालयात मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा आक्रोश
- पुण्यात खळबळ! नाईट शिफ्टवरून घरी परतलेल्या मुलाला दिसले आई-वडील मृतावस्थेत; कोंढव्यातील दुर्दैवी घटना

