दिनांक –०३/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- धारावी-माहीम जंक्शनवर शुक्रवारी पहाटे एका मोठ्या ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने टॅक्सी आणि टेम्पोसह अनेक पार्क केलेल्या वाहनांना धडकल्याने मोठा अपघात झाला. या धडकेमुळे एकूण पाच वाहनांचे गंभीर नुकसान झाले असून त्यातील काही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघातस्थळावरील व्हिडिओंमध्ये टॅक्सी आणि टेम्पो जवळच्या नाल्यात पडताना दिसत आहेत, तर अपघातात अडकलेला ट्रेलर नाल्याच्या दिशेने उतारावर अडकलेला दिसत आहे. ट्रॅफिक टाळण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने ट्रेलर काढण्यात आला.
शाहुनगर पोलीस आणि माहीम वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळून नुकसानीचा अंदाज घेतला. अपघात स्थळावरून मोठा ट्रेलर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक छोटी क्रेन पाचारण करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. बीएमसी आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, 4 ते 5 वाहने मिठी नदीत पडल्याची घटना सकाळी 6.50 वाजता झाली. सध्या तरी कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. अपघाताचे ठिकाण केमकर चौक, टी जंक्शन, साहू नगर, धारावी येथील अभिनंदन बारजवळ असल्याचे सांगण्यात आले.
Breaking
- उल्हासनगरमध्ये मुदत संपण्यास अवघा एक महिना शिल्लक असलेल्या लहान मुलांच्या औषधांचे आशा सेविकांमार्फत वितरण; नागरिकांकडून चौकशीची मागणी
- प्रधानमंत्री आवास योजनेबाबत संतोष नगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता; विठाई प्रतिष्ठानच्या बैठकीत नगरसेवकांचे आश्वासन
- सातार्डेत एकाच रात्री तीन घरफोड्या; पोलीस गस्त कुठे? चोरट्यांचा धुमाकूळ, ग्रामस्थांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
- लोकलमध्ये रक्तरंजित थरार… दरवाजा बंद करायला सांगताच संताप, प्रवाशालाच भोसकलं;
- गर्जा महाराष्ट्र न्यूजचा दणका: एम.एम.आर.डी. परिसरातील लॉजिंग-बोर्डिंगमधील गैरप्रकारांवर ‘वॉच’; पोलिसांना तातडीने तपासणीचे आवाहन.
- भिवंडीत बांगलादेशातून महिला आणणारे मोठे रॅकेट सक्रिय; पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
- भिवंडी महानगरपालिका आयुक्त कुंभकरणाच्या झोपेत? प्रभाग समिती २ मध्ये अवैध बांधकामांचा सुळसुळाट!
- भिवंडीत रात्रभर सुरू राहणाऱ्या हॉटेल्समुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ? नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोडे कधी लक्ष देणार? नागरिकांचा सवाल.

