दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- एरंडोल-पारोळा मतदार संघात महाराष्ट्र विधान सभेसाठी इच्छुक उमेदवार श्री.अनिल महाजन यांनी आज पारोळा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये यांनी वसंत सहकारी साखर कारखाना कोणामुळे डबघाईला गेला? शेवटचा प्रशासक या साखर कारखान्यावर कोण होतं? हे प्रश्न विचारले आहेत. 25 वर्षात वाघ्या-बर्डी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? याची देखील त्यांनी विचारणा केली आहे. दरम्यान निल कमल पार्टीकल बोर्ड याची स्थापना करून बोर्डाच्या नावाने शेकडो एकर जमीन पारोळा तालुक्यात म्हसवे गावा लगत बोर्डाच्या नावाने हडप केलीली जमीन कोणाची आहे. हेही विद्यमान आमदारने जनतेला सांगितले पाहिजे.असे ते म्हणाले आहेत.

आमदारकीचा दुरुपयोग करून खोटे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शाळेत अपंग युनिटची स्थापना करून अनेक सुशिक्षित तरुणांकडून युनिट शिक्षक या नावाने नेमणूक सुरू करून करोडो रुपयांच्या चुना आमदार चिमणराव पाटील यांनी सुशिक्षित तरुणांना चुना लावला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक तरुण देशोधडीला लागले आहे.असे अनिल महाजन म्हणाले आहेत. स्थानिक आमदार त्यांच्या शिक्षण संस्थेचे कर्मचारी, शिक्षक यांचा खाजगी कामासाठी वापरतात. त्यांच्या घरात पाणी वाटणाऱ्या पासून ते वाहन चालवणाऱ्या चालकापर्यंत सर्व शिक्षण संस्थेचे लोक आहेत. यांचा पगार सर्व शिक्षण संस्थेतून निघतो त्यामुळे शासनाची अनुदानित संस्था असल्यामुळे हा सर्व पगार शासनाकडून संस्थेला मिळत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.

आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांच्या सोशल मीडीयावरील वक्तव्याचा देखील त्यांनी उल्लेख केला आहे. ‘स्वातंत्र्य काळानंतर सर्वात जास्त निधी आमदार चिमणराव पाटलांनी आणलेला आहे.’ असे अमोल पाटील म्हणाले आहेत . हे म्हणजे “खोटं बोल पण रेटून बोल” अशी नीती हे वापरतात. उद्या हे सांगतील की स्वातंत्र्य ही भारताला आम्हीच मिळवून दिले आहे.’ अमोल पाटील यांचं वक्तव्य बालिशपणाचं आणि हास्यास्पद असल्याचं महाजन म्हणाले आहेत.

अंजनी धरण पूर्ण भरण्यासाठी दोन गावांचे पुनर्वसन बाकी आहे. हनुमंत खेडे व सोनबर्डी या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी आमदार चिमणराव आबा यांनी काही प्रयत्न केले नाही.अंजनी धरण पूर्ण भरत नाही.ही बाब देखील त्यांनी समोर आणली आहे.

मतदारसंघातील लोकांनी संधी दिल्यास अनिल महाजन यांची ध्येयं काय?

तालुक्यातील बंद पडलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी भर देणार

हायवे लगत मतदारसंघ असल्याने अनेक उद्योग कंपन्या, एमआयडीसी सुरू करणार.

घरातील बेरोजगार तरुणांचा टक्का कमी करण्यावर भर असेल.

सर्व समाजातील घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न असेल कुठेही जातिवाद पोखरणार नाही याची काळजी घेणार

तालुक्यात सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतील यासाठी प्रयत्न करणार.

शेतकरी ,शेत मजूर ,कष्टकरी या प्रत्येक घटकासाठी काम करणार.
लाडकी बहीण योजना केवळ निवडणूकीपर्यंत दिलेले गाजर आहे. सरकारने खाद्य तेल. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर वाढवत महागाई वाढवली आहे. यावेळी महाजन यांनी जनता आता सरकारला कंटाळली असुन त्यांचे सरकार जाणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Share.