दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते विधान मंडळ सदस्य डॉ भारती लवेकर, अभिनेते सुनील पॉल, क्रिकेट पंच अनिल चौधरी, डॉ बसंत गोयल, लेखक मुस्तफा गोम आदींना भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, बुद्धांजली रिसर्च फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलाश मासूम आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.

Share.