दिनांक – २६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  ज्या भूमीत पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने १९७१ मध्ये हुसकावून लावले होते. त्याच भूमीत आता पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी सैन्याला प्रशिक्षण देणार आहे. बांगलादेशच्या विद्यमान अंतरिम सरकारने पाकिस्तानशी लष्करी आणि सामरिक संबंध वाढवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, यामुळे भारतासमोर नवीन आव्हान निर्माण होऊ शकतात. बांगलादेश लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक फेब्रुवारी २०२५ मध्ये तेथे पोहोचणार आहे.

Share.