दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- द बॉडी शॉप या मूळच्या ब्रिटिश आंतरराष्ट्रीय एथिकल ब्यूटी ब्रॅण्डने आपली लोकप्रिय व्हिटॅमिन सी स्किनकेअर श्रेणी सर्वांपुढे आणण्यासाठी भारतीय मॉडेल व अभिनेत्री डायना पेंटी हिच्याशी सहयोग केला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून एका सुलभ पण प्रभावी दिनक्रमावर प्रकाश टाकला जाणार आहे. या दिनक्रमामुळे त्वचेवर नैसर्गिक, तेजस्वी चमक येते. सणासुदीच्या काळात त्वचेला झळाळी आणण्यासाठी हा दिनक्रम उत्तम आहे.
व्हिटॅमिन सी स्किनकेअर श्रेणीमध्ये डेली ग्लो क्लींजिंग पॉलिश, ग्लो रीव्हिलिंग सीरम, ग्लो बूस्टिंग इंटेन्स मॉश्चुरायजर आदी उप्तादनांचा समावेश आहे.द बॉडी शॉपने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये डायना तिच्या त्वचेची काळजी घेण्याच्या व्यक्तिगत दिनक्रमाबद्दल (स्किनकेअर रुटीन) सांगते. तिच्या रुटीनमध्ये द बॉडी शॉपच्या व्हिटॅमिन सी स्किनकेअर उत्पादनांचा समावेश आहे. प्रत्येक सणाला चमकत राहणाऱ्या तेजस्वी त्वचेसाठी काय केलेच पाहिजे हे ती सांगते.
द बॉडी शॉपच्या दक्षिण आशिया विभागाच्या प्रमुख ब्रॅण्ड अधिकारी श्रीमती हरमीत सिंग म्हणाल्या, “सणासुदीच्या काळात निरोगी, चमकदार त्वचा तर हवीच. ही चमक सोप्या पण प्रभावी पद्धतीने देण्याच्या दृष्टीनेच आमची सर्वाधिक विक्री असलेली व्हिटॅमिन सी श्रेणी विकसित करण्यात आली आहे. डायना त्वचेची ज्या पद्धतीने काळजी घेते, ते आमच्या ब्रॅण्ड मूल्यांशी चपखल जुळणारे आहे. अंतर्बाह्य तेज मिळवून देणारे व्यक्तीनुरूप स्किनकेअर रूटीन बसवणे अगदी व्यग्र असतानाही किती सोपे आहे हे दाखवताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”
डायना पेंटी यांनी या सहयोगाबद्दल आनंद व्यक्त केला, त्या म्हणाल्या, “सणासुदीचा काळ चमकदार त्वचेसह साजरा करण्यासाठी द बॉडी शॉपसोबत सहयोग करताना मला खूपच आनंद होत आहे! कामु कामु आणि बाकुचिओलसारख्या नैसर्गिक घटकांनी ही व्हिटॅमिन सी श्रेणीतील उत्पादने समृद्ध आहेत. ही उत्पादने माझ्या त्वचेला तेजस्वी, निरोगी चमक देतात, आगामी सणासुदीच्या काळासाठी ही उत्पादने उत्तम आहेत.”