दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सणांच्या कालावधीत अन्न व पूरक उत्पादने खरेदीबाबत घ्यावयाची खबरदारी या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागचे आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
सणासुदीच्या दिवसांत गोडधोड खाद्यपदार्थंची रेलचेल असते. या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ व उत्पादने उपलब्ध व्हावीत, नागरिकांची कोणतीही फसवणूक होवू नये यासाठी शासनस्तरावर वेळीच विशेष खबरदारी घेण्यात येते. अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येणारी देखरेख, नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना घ्यावयाची खबरदारी याबाबत डी. आर. गहाणे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 9 ऑक्टोबर, गुरूवार दि. 10 आणि शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.