दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या मौजे सावरगांव माळ येथे कृषी समृध्दी नवनगर (स्मार्ट सिटी) विकसित करतांना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
आज मंत्रालयात बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या नवनगर (स्मार्ट सिटी) कामाचा आढावा बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब. गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, व्यवस्थापक दत्तप्रसाद नडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.भुसे म्हणाले, सावरगाव माळ येथील उर्वरित भागाचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच ज्या गावांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असेल त्याची अद्ययावत माहिती उपविभागीय अधिकारी यांनी संबंधितांकडून घ्यावी.
Breaking
- पुणे धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागरांचा मेरिटवर पारदर्शक कारभार!
- पाचोरा शहरातील अवैध धंद्याच्या टपऱ्याचे अतिक्रमण काढले. “कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे” – श्री.मंगेश देवरे ,पाचोरा नगरपरिषद मुख्यअधिकारी.
- अवैधधंदे सट्टाच्या टपऱ्याचे अतिक्रमण पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात न .पा. अधिकारी कुंभ करणाच्या गाड़ झोपेत.
- वडिलांनी हाकलून दिले, एका वर्षात घटस्फोट, संपूर्ण कारकिर्दीत फक्त 2 हिट्स सिनेमे; तरीही अभिनेत्रीचं नेटवर्थ 170 करोड
- ‘आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासात कारवाई करा’; रुपाली चाकणकरांचे आदेश
- विठाई प्रतिष्ठान (रजि) आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव २०२५
- वाडा तालुक्यात टायर जाळणाऱ्या अवैध कंपनीत स्फोट झाला यात पाच लोक गंभीर जखमी तर दोन बालक मयत झाले आहेत.
- नोकरीवरून काढले म्हणून कर्मचाऱ्याने ऑफिसच्या गेटवरच केली काळी जादू