दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल) आपल्‍या स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून सरकारच्‍या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाप्रती कटिबद्ध आहे. या वर्षी, मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांनी फोक्‍सवॅगन टायगुन एसयूव्‍ही आणि फोक्‍सवॅगन व्‍हर्टस सेदानला एकत्र करत नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक डिझाइन केला आहे. कार संकल्‍पनेला अंतिम रूप देणे, संकल्‍पनांचा संग्रह, बाजारपेठ विश्‍लेषण, संशोधनव विकास, खरेदी, पॅकिंग आणि नऊ महिन्‍यांहून अधिक कालावधीमध्‍ये लाँचसाठी अंतिम कार टेस्टिंग अशा विविध टप्‍प्‍यांमध्‍ये हा प्रकल्‍प राबवण्‍यात आला. विद्यार्थ्‍यांनी विविध पार्टस् डिझाइन व ३डी-प्रिंटींग केले, ज्‍यामधून डिझाइनमधील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी अत्‍याधुनिक उत्‍पादन तंत्रांचा वापर करण्‍याबाबत त्‍यांच्‍या क्षमतेला दाखवले. त्‍यांनी वेईकलला अंडरबॉडी प्रोटेक्‍शन, स्‍टडेड टायर्स, अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि स्‍पेशल रूफ-माऊंटेड लाइट्स अशा विशेषीकृत अॅक्‍सेसरीजसह सुसज्‍ज केले, ज्‍यामधून शक्तिशाली पिकअप ट्रक डिझाइन करण्‍यात आले.

संपूर्ण प्रकल्‍पादरम्‍यान एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलमधील कुशल व्‍यावसायिकांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. मेन्‍टोर्सनी विद्यार्थ्‍यांना पुरवठादार व उद्योग तज्ञांसोबत सहयोग करण्‍यास मार्गदर्शन करण्‍यासोबत मदत केली, तसेच त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांना प्रत्‍यक्षात आणण्‍यास देखील साह्य केले. हा प्रकल्‍प कंपनी राबवत असलेल्‍या इतर उपक्रमांपैकी एक आहे, जे नुकतेच घोषणा करण्‍यात आलेल्‍या केंद्रीय अर्थसंकल्‍प २०२४ मधील दृष्टिकोनानुसार सरकारच्‍या तरूणांना कुशल करण्‍यावरील फोकसशी संलग्‍न आहेत.

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा म्‍हणाले, ”स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टचा भाग महणून आमच्‍या मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांची पिकअप ट्रक विकसित करण्‍याची अद्वितीय संकल्‍पना पाहून आम्‍ही प्रभावित झालो आहोत. आमचा अद्वितीय स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट उत्तम प्‍लॅटफॉर्म आहे, जो भावी गतीशीलता शेअर करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांच्‍या कल्‍पनाशक्‍तीला वाव देतो. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही देशाच्‍या ‘स्किल इंडिया’ मिशनशी संलग्‍न झालो आहोत, जेथे आम्‍ही स्‍थानिक टॅलेंट जागतिक इकोसिस्‍टममध्‍ये प्रगती करू शकणारी प्रत्‍यक्ष अध्‍ययनाची संस्‍कृती बिंबवत आहोत. आमचा ठाम विश्‍वास आहे की, सरकारचे हे उपक्रम ‘विकसित भारत’साठी मुलभूत ठरतील. स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियामध्‍ये आम्‍ही समाजाच्‍या एकूण विकासाप्रती, स्‍थानिक समुदायांना पाठिंबा देण्‍याप्रती आणि तरूणांना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

स्‍कोडा ऑटो ए. एस.च्‍या मॅनेजमेंट फॉर प्रॉडक्‍शन अँड लॉजिस्टिक्‍सचे बोर्ड सदस्‍य अँड्रीस डिक म्‍हणाले, ”भारतात स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट २.० च्‍या यशस्‍वी पूर्ततेमधून तरूण टॅलेंट उद्योग-अग्रणी वेईकल्‍स डिझाइन करण्‍यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, अचूकता आणि कार्यक्षमतेचा योग्‍यरित्‍या करू शकणारे वापर दिसून येतो. भारतात जागतिक उत्‍पादन पद्धती आणत आमचा वातावरण निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे, जेथे तरूण इनोव्‍हेटर्स भावी चेंजमेकर्स होऊ शकतील, जागतिक उत्‍पादन हब म्‍हणून भारताचे स्‍थान अधिक प्रबळ करू शकतील. आमचे प्रकल्‍प उत्‍पादन क्षमता दृढ करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासोबत खात्री देतात की, भावी पिढी जागतिक स्‍तरावर नाविन्‍यतेला चालना देण्‍यासाठी सुसज्‍ज असेल.”

एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल अकॅडमीचे ड्युअल वोकेशनल ट्रेनिंग इन मेकट्रॉनिक्‍स हा २०११ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेला प्रमुख प्रोग्राम आहे आणि माध्‍यमिक शाळांमधील विद्यार्थ्‍यांना अपस्किल करण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिला आहे. जर्मनीच्‍या व्‍यावसायिक सिस्‍टमनुसार तयार करण्‍यात आलेला हा पूर्ण-वेळ ३.५-वर्षांचा कोर्स तरूण टॅलेंट्सना ऑटोमोटिव्‍ह उद्योगाकरिता विकसित आणि सुसज्‍ज करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा प्रोग्राम तंत्रज्ञान सर्जनशीलता, आत्‍मविश्‍वास बिंबवतो आणि नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्‍यासाठी समस्‍या-निवारण मानसिकतेला चालना देतो. हा प्रकल्‍प विद्यार्थ्‍यांना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याचे स्‍वातंत्र्य देतो आणि ऑटोमोथटिव्‍ह उद्योग, भावी ट्रेण्‍ड्स व व्‍हीडब्‍ल्‍यू ग्रुप मानकांबाबत बहुमूल्‍य माहिती देतो.

जागतिक स्‍तरावर स्‍कोडाचा स्‍कोडा अॅकडमी अंतर्गत अझुबी स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट आहे. ग्रुपचा आपल्‍या वोकेशनल स्‍कूलमध्‍ये उच्‍च दर्जाचे प्रशिक्षण दाखवण्‍याचा, तसेच देशाच्‍या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे. हा प्रकल्‍प विद्यार्थ्‍यांना संकल्‍पना मूल्‍यांकन व अंमलबजावणीमधील व्‍यावहारिक अनुभव देतो, ज्‍यामुळे त्‍यांना सैद्धांतिक संकल्‍पना अधिक सविस्‍तरपणे समजतात, तसेच उत्‍पादन प्रक्रियेमधील त्‍यांची कौशल्‍ये निपुण होण्‍यास मदत होते.

Share.