दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उल्हासनगर शहरात बंदी असलेल्या गुटख्याचा धंदा सर्रास सुरू आहे. शहरातील अनेक गुटखा माफिया शहरात सक्रिय असून गुजरातसह देशाच्या कानाकोपऱ्यातून बंदी असलेला गुटखा शहरात आणतात. अशा स्थितीत विठ्ठलवाडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन गुटखा तस्करांना अटक करून गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गुटख्याच्या तस्करांना पकडले, त्यात 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि फ्लेवरयुक्त तंबाखू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.
Breaking
- उल्हासनगरमध्ये मुदत संपण्यास अवघा एक महिना शिल्लक असलेल्या लहान मुलांच्या औषधांचे आशा सेविकांमार्फत वितरण; नागरिकांकडून चौकशीची मागणी
- प्रधानमंत्री आवास योजनेबाबत संतोष नगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता; विठाई प्रतिष्ठानच्या बैठकीत नगरसेवकांचे आश्वासन
- सातार्डेत एकाच रात्री तीन घरफोड्या; पोलीस गस्त कुठे? चोरट्यांचा धुमाकूळ, ग्रामस्थांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
- लोकलमध्ये रक्तरंजित थरार… दरवाजा बंद करायला सांगताच संताप, प्रवाशालाच भोसकलं;
- गर्जा महाराष्ट्र न्यूजचा दणका: एम.एम.आर.डी. परिसरातील लॉजिंग-बोर्डिंगमधील गैरप्रकारांवर ‘वॉच’; पोलिसांना तातडीने तपासणीचे आवाहन.
- भिवंडीत बांगलादेशातून महिला आणणारे मोठे रॅकेट सक्रिय; पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
- भिवंडी महानगरपालिका आयुक्त कुंभकरणाच्या झोपेत? प्रभाग समिती २ मध्ये अवैध बांधकामांचा सुळसुळाट!
- भिवंडीत रात्रभर सुरू राहणाऱ्या हॉटेल्समुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ? नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोडे कधी लक्ष देणार? नागरिकांचा सवाल.

