VINESH PHOGAT । करोडों भारतीयांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तिने अंतिम फेरी गाठली होती, पण आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. याचा स्पष्ट अर्थ विनेश फोगट आज ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भाग घेऊ शकणार नाही.

संपूर्ण देशाला विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती आणि ती आज रात्री उशिरा तिचा सुवर्णपदकासाठीचा सामना खेळणार होती, पण आता तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र का ठरवण्यात आले ते जाणून घेऊया… विनेश फोगट हिला ५० किलो वजनी गटात अपात्र ठरवण्यात आले आहे. तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

Share.