दिनांक – २९/०८/२०२४,मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टीका केली आहे. राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय असे ते म्हणाले
आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या राज्यातील महिला, मुली, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नाहीत असे दिसते. अशा बातम्या वाचून आपल्या राज्यात “कणा नसलेले सरकार” आहे हेच सिद्ध होतय. याआधी आम्ही युपी, बिहारला असे प्रकार घडतात असे ऐकत होतो. मात्र आता महाराष्ट्रातही असे प्रकार घडत आहेत हे पाहून वेदना होतात.