सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. जाधव यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
दिनांक – ३१/०८/२०२४, पाचोरा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा तालुक्यातील गुढे खेडगाव रस्ता हा अत्यंत रहदारी रस्ता असून या ठिकाणी पाटावर असलेला पूल ठेकेदाराने सहा महिन्यापासून नवीन पूल करण्यासाठी तोडून ठेवलेला आहे. ठेकेदाराने सुरुवातीचे तीन-चार महिने कामाला सुरुवात केली, नाही भर पावसाळ्यामध्ये त्याने काम सुरू केले तेही काम अत्यंत संथ गतीने चालू होते, या ठिकाणी जवळजवळ २०० ते ३०० शेतकऱ्यांचा दैनंदिन वापर आहे, ठेकेदाराने पर्यायी रस्ता म्हणून तीन फुटाचा पाईप टाकून रस्ता बनवलेला होता पण हा रस्ता वाहून गेला. पर्यायी रस्ता गेल्या पंधरा-वीस दिवसापासून वाहून गेलेला आहे. शेतकऱ्यांसाठी जाण्यासाठी त्यांनी कुठलाही पर्यायी रस्ता उपलब्ध केला नाही. शेतकऱ्यांकडून ठेकेदाराला वारंवार फोन करूनहि ठेकेदार फोन उचलत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.जाधव त्याच्यात जातीने लक्ष घालत नाही. या ठिकाणी सगळे लिंबू, केळी, कपाशी, ऊस, उत्पादक शेतकरी असून दोन ते तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटर फेरा मारून आपल्या शेतात यावे लागते.
गुढे गावातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्येबाबत बांधकाम ठेकेदार अमोल पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.जाधव यांच्या दिरंगाई बाबत मंत्रालयातील वरिष्ठ पत्रकार तसेच गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे मुख्य संपादक अनिल महाजन हे हे स्वतः याबाबत मा.श्री.रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य. तसेच प्रधान सचिव , सार्वजनिक बांधकाम विभाग,मंत्रालय यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. ठेकेदार व शाखा अभियंता यांची लेखी तक्रार करणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी गुढे गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल महाजन मदतीला धावले.
गर्जा महाराष्ट्र न्यूज कडून संबंधित शाखा अभियंता व ठेकेदार यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.