दिनांक – १७/०२/२०२५, मुंबई / पाचोरा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा शहरात भाजी मंडई मध्ये अवैध धंद्यांच्या अवैध टपऱ्यांचे अतिक्रमण दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाचोरा नगरपरिषदचे मुख्यअधिकारी श्री.मंगेश देवरे व त्यांच्या टीमने सदरचे अतिक्रमण काढले व शहरात मोठी कार्यवाही केली.
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी गर्जा महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पाचोरा शहरातील अवैध धंद्यांच्या अतिक्रमणा बाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल थेट मंत्रालय स्तरापर्यंत व जळगाव जिल्हा अधिकारी श्री.आयुष्य प्रसाद सर यांनी घेतली व पाचोरा नगरपालिकेतील मुख्य अधिकाऱ्यांना सदर विषयाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
त्यात कुठलाही विलंब न करता पाचोरा नगरपरिषदचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी टीम तयार करून व स्थानिक पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता नगरपरिषद जीन येथे असलेले अवैध धंद्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.नगरपरिषदेचा मोठा फौज फाटा ट्रॅक्टर, जेसीबी लावून मोठी तोडक कारवाई केली. सदर अवैध अतिक्रमणाच्या जागी तात्काळ वॉल कंपाऊंड मारून शेजारील शॉपिंग कॉम्प्लेक्स गाळे धारकांसाठी पे अँड पार्क पार्किंग सुरू करण्याचे आश्वासन दिले. या कार्यवाही बाबत शहरातून प्रतिष्ठित वर्गाकडून मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचे अभिनंदन होत आहे.
तसेच आगामी काळात पाचोरा शहरात बाकी असलेल्या प्रमुख चौकातील अवैध अतिक्रमण काढणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी त्यावेळी सांगितले गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाच्या माध्यमातून मुख्यअधिकारी यांना सूचित करण्यात येते की, पाचोरा शहरातील जे प्रमुख चौक आहे ते तात्काळ मोकळे करावे. (०१) छत्रपती शिवाजी महाराज चौक (०२)महाराणा प्रताप चौक (०३) जारगाव चौफुली (०४) भारत डेअरी बस थांबा (०५) जामनेर रोड (०६)एसटी स्टँड रोड पाचोरा या ठिकाणावरील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे रहदारीला अडचण होत आहे. यातील काही चौकामध्ये अवैध धंद्यांच्या टपऱ्या आहेत मध्ये सट्टा–चक्री या ठिकाणी सुरू आहेत. तेही ताबडतोब काढण्यात यावे पाचोरा शहराला व पाचोरा शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा व स्वच्छ सुंदर शहर व्हावे.
पाचोरा नगरपरिषदेला सध्या तरी एक हुशार ,डॅशिंग ,शिस्तबद्ध सर्वसामान्य नागरिकांसाठी, आपला हक्काचा व्यक्ती म्हणून वाटणारे व्यक्तिमत्व मुख्याधिकारी मंगेश देवरे हे लाभले आहेत. कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे शिस्त बिघडली तर कुठल्याही राजकारणी किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या आहारी न जाता कायदा सर्वस्व मानून काम करणारे मंगेश देवरे आहेत. त्यामुळे जनसामान्यात त्याची प्रतिमा पाचोरा शहरात उंचावली आहे. राज्यात पालिका आयुक्त म्हणून गाजलेले अधिकारी श्री. तुकाराम मुंडे यांची पुनरावृत्ती पाचोरा शहरात होणार आगामी काळात मंगेश देवरे हे पाचोरा नगरपरिषदेतून शिस्त मोडणाऱ्यांना तसेच शहरात अवैध अतिक्रमण करणाऱ्यांना लोकांना कडक शासन करतील व तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेत मंगेश देवरे हे अधिकारी गाजतील सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत व नगरपालिकेचे प्रशासन चालवण्यासाठी कटिबद्ध ठरतील अशी चर्चा जनसामान्यात होत आहे. जनतेची अपेक्षा श्री.देवरे यांच्याकडून आहे.