दिनांक – ०४/०२/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-पुणे जिल्ह्यात असलेल्या आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. आळंदी परिसरातील वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषणसंदर्भात महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी करत आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासाचा आढावा रूपाली चाकणकर यांनी घेतला.
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –०३/०२/२०२५, उल्हासनगर प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सर्व भाविक भक्तांना बाप्पांच्या दर्शनासाठी सस्नेह निमंत्रण विठाई प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे मंडळाचे प्रथम वर्ष आहे. गणपती बाप्पांचा आगमन सोहळा धुमधडाक्यात झाला. मंडळातर्फे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ०३/०२/२०२५ सोमवार रोजी कै. भारत गरड यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य आरोग्य शिबीर प्रभागातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर सकाळी ११:००वाजता , भाव व भक्ती गीते कार्यक्रम (माऊली इव्हेंट्स-विनोद निंबाळकर) सायंकाळी ०७:०० ते १०:०० दिनांक ०४/०२/२०२५ मंगळवार रोजी सत्यनारायण महापूजा,दुपारी भंडारा (महाप्रसाद), सायंकाळी ०६:०० ते १०:०० वाजे पर्यंत होम मिनिस्ट खेळ पैठणीचा हळदी कुंकू अभिनेते विशाल सदफुले…
दिनांक –०१/०२/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वाडा तालुक्यात टायर जाळणाऱ्या अवैध कंपनीत स्फोट झाला यात पाच लोक गंभीर जखमी तर दोन बालक मयत झाले आहेत. या अवैध कंपन्यांना आशीर्वाद कोणाचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी व औद्योगिक आरोग्य संचालनालय सुरक्षा या विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी- अनिल महाजन,वरिष्ठ पत्रकार मंत्रालय विधिमंडळ. अध्यक्ष, पर्यावरण सामाजिक चळवळ. जिल्हा-पालघर, तालुका-,वाडा, -वडवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये एम डी पायरोलिसेस या कंपनीत बुधवारी सायंकाळी ०६ वाजता बॉयलर तथा रिऍक्टरचा स्फोट झाला. त्यात अंदाजे एकूण पाच जण जखमी झालेत. त्यापैकी दोन बालक (कामगाराची मुले ) हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल असताना मृत्युमुखी झाले आहेत. या घटनास्थळी तात्काळ…
दिनांक –२२/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कर्नाटकातील बेल्लारी शहरातील एका कंपनीच्या कार्यालयासमोर काही अज्ञात लोकांनी काळी जादू केल्याची घटना समोर आली आहे. ही काळी जादू कोणी आणि कधी केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनी तोट्यात चालत आहे, त्यामुळे 50 जणांना पदावरून काढून टाकण्यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. त्यापैकी एका कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याचा संशय मॅनेजमेंटला आहे. ऑफिससमोर एक काळी बाहुली, एक मोठा भोपळा, एक नारळ, 8 लिंबू, केशर आणि लाल सिंदूर पडले होते. हे पाहून कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला.
दिनांक –०३/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- : नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तुम्ही बाहेर गेले नसाल तर दुबई सिटी कार्निव्हल हा एक उत्तम पर्याय आहे. झिंगाबाई टाकळी, झांडा चौक खुले मैदान, राम मंदिरासमोर या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. जिथे तुम्हाला सिंगापूर आणि दुबईची संस्कृती अनुभवता येईल. संध्याकाळच्या वेळी लोक येथे आनंद घेण्यासाठी येत आहेत. कर्नाटकातील आदिवासी लक्ष्मी हर्बल हेअर ऑइलचा लाइव्ह डेमो केस गळणे, तुटणे आणि कोंडा फक्त पाच दिवसात बरा करेल. कार्निव्हलमध्ये कपडे, पुस्तके आणि स्वादिष्ट पदार्थ विक्रीचे 100 स्टॉल्स आहेत. यामध्ये डिझायनर कुर्त्या, सूट, काश्मीरपासून बंगालपर्यंतच्या प्रसिद्ध साड्या, नवीन फॅशनचे कपडे, दागिने, पुस्तके आणि पापड, लोणचे यांसारख्या…
दिनांक –०३/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नागपूरमध्ये पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या स्कूटरच्या ट्रंकमधून 41 लाख रुपये जप्त केले आहेत. तरुणाला या रोख रकमेचा हिशेब देता आला नाही, त्यामुळे पोलिसांना याचा हवालाशी संबंध असल्याचा संशय आला. याप्रकरणी दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नागपुरात पोलिसांनी वाहने अडवून त्यांची तपासणी केली. यादरम्यान स्कूटरवरून आलेल्या दोन तरुणांना थांबवण्यात आले. पोलिसांनी स्कूटरची तपासणी केली असता ट्रंकमध्ये ४१ लाखांची रोकड आढळून आली. एवढी रक्कम पाहून पोलीस अधिकारीही आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी या रकमेचा हिशेब विचारला असता, तरुण कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत. हा पैसा हवाला व्यवसायाशी संबंधित असण्याची शक्यता पोलिसांना…
दिनांक –०३/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- धारावी-माहीम जंक्शनवर शुक्रवारी पहाटे एका मोठ्या ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने टॅक्सी आणि टेम्पोसह अनेक पार्क केलेल्या वाहनांना धडकल्याने मोठा अपघात झाला. या धडकेमुळे एकूण पाच वाहनांचे गंभीर नुकसान झाले असून त्यातील काही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातस्थळावरील व्हिडिओंमध्ये टॅक्सी आणि टेम्पो जवळच्या नाल्यात पडताना दिसत आहेत, तर अपघातात अडकलेला ट्रेलर नाल्याच्या दिशेने उतारावर अडकलेला दिसत आहे. ट्रॅफिक टाळण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने ट्रेलर काढण्यात आला. शाहुनगर पोलीस आणि माहीम वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळून नुकसानीचा अंदाज घेतला. अपघात स्थळावरून मोठा ट्रेलर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक छोटी…
दिनांक –०३/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मराठी भाषेच्या वापरावरून झालेल्या वादानंतर एका मराठी तरुणाला कान पकडून माफी मागावी लागली. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंब्रा येथील बाजारात गुरुवारी एका तरुणाने भाजी विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने वादाला सुरुवात झाली. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे मराठी भाषेच्या वापरावरून झालेल्या वादानंतर एका मराठी तरुणाला कान पकडून माफी मागावी लागल्याची एक वादग्रस्त घटना नुकतीच समोर आली आहे. गुरुवारी तरुणाने एका भाजी विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने वाद सुरू झाला. …
दिनांक –०२/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- हरिनामाचा जप करीत असताना पांडुरंग उलपे यांना १५ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात हलवले. अनेक प्रयत्नांनंतर रात्री अखेर डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि ॲम्ब्युलन्स मधून त्यांना घरी नेताना रस्त्यात बसलेल्या धक्क्याने त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाली. त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले. पंधरा दिवस त्यांच्यावर उपचार झाले. त्यानंतर नव्या दमाने ते पुन्हा सोमवारी घरी परतल्याने देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय आला आहे. हा कुठल्या सिनेमातील प्रसंग नाही, तर प्रत्यक्ष उलपे मळा परिसरात घडलेली ही घटना आहे. पांडुरंग रामा…
दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भीकेला लागलेला पाकिस्तान सातत्याने भारताविरोधात दहशतवादी कट रचत राहतो. भारतीय सैन्यदेखील प्रत्येकवेळी पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडते. गेल्या वर्षभरात भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवादी मारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यातील 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते.
