दिनांक – २९/०३/२०२५, मंत्रालय विधिमंडळ प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज मुंबई:- मुंबई उच्च न्यायालयात एडव्होकेट श्री विनायक साळोखे यानी केलेल्या योग्य मांडणी मुळे बनावट पद्धितीने विकलेले चंद्रपुर येथील व्हिसन्स वाइनशॉप मूळ मालकाला परत मिळाले

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ,एक्साईज – दारूबंदी खात्याचे मंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर दारूबंदी खात्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे मोठे आव्हान अजितदादा समोर आहे. दादा भ्रष्टाचाराला आळा घालतील का? सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळेल का?
कुंपण शेत खात आहे .खात्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या लाचखोरी पान खाऊन तोंड लाल झाले आहे. तसेच काही दारूबंदी अधिकाऱ्यांनी व त्यांच्या ऑफिसमध्ये वावरणारे दलालाच्या टोळी सोबत संगमत करून त्याचबरोबर काही वकिलांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार करून पुणे जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून आदेश घेतले, चंद्रपूर येथील अभिजीत पद्मावार यांचे वडिलांच्या नावे असलेले “व्हिनस वाईन” शॉप लायसन्स म्हणजे एकाच्या नावाने असलेले वाईनशॉप लायसन्स सध्या बाजारात विकण्या ची किंमत 14 ते 15 कोटी रुपये आहे त्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने त्या व्यक्तीला अंधारात ठेवून त्यांच्या जागी अनोळखी माणूस उभा करून आणि परस्पर वसुमल लालचंद मंकानी , प्रदीप लालचंद मंकानी यांच्या नावाने ट्रान्सफर करून घेतला. यांच्या नावे याआधी औरंगाबाद मध्ये वाईन शॉप चे लायसन्स कार्यरत आहे. असे खूप मोठा गैरप्रकार हा आपल्या महाराष्ट्रात घडला आहे आणि सध्या त्या खाते मंत्री आहेत. परखड व्यक्तिमत्व असणारे अजितदादा पवार. अद्याप पर्यंत हा सर्व प्रकार अजितदादा यांच्या लक्षात आला का ? की आला नाही ? हेच अजून महाराष्ट्राचे जनतेला कळत नाही.

बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री झालेले वाईन शॉपच्या लायसन्स प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे यांची आदेश कायम ठेवून आयुक्त राज्य उत्पादन शुल्क व राज्य सरकार राज्य उत्पादन शुल्क यांचा दोन्ही वादग्रस्त आदेश कायद्याने कायम ठेवता येत नाहीत निर्णय रद्द करून माननीय उच्च न्यायालयाने सदर निर्णय दिला.

वाईनशॉपचे लायसन्स मूळ मालकाला परत मिळाले व बनावट कागदपत्र तयार करून वाईन शॉपचे लायसन परस्पर विक्री करणाऱ्या वसुमल लालचंद मंकानी आणि प्रदीप लालचंद मंकानी व मुख्य भूमिका बजावणारे वकील व अनोळखी व्यक्तीवर विरुद्ध या आधीच जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने पुणे येथील बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. काही कारणास्तव परिस्थितीमुळे सध्या सदर गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांच पुणे यांना दिलेला आहे. महाराष्ट्रमध्ये अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या मोहा-पायी याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. तसेच काही भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल कधी होईल की नाही? याची चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे आणि कायदा जिवंत आहे आणि तो सर्वांना सारखाच आहे त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालय मधील रिट याचिका क्र. १८१२/२०२५ कोर्ट समोर योग्य प्रकारे मांडणी केल्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करून खऱ्या पद्मावार यांच्या जागे अनोळखी माणूस उभा करून परस्पर वसुमल लालचंद मंकानी , प्रदीप लालचंद मंकानी नावेकेलेले “व्हिनस वाईन” शॉप लायसन्स मूळ मालकाला परत म्हणजे श्री. पद्मावार यांना मिळाले व कायदा जिवंत असल्याची जाणीव जनतेला झाली. पण त्यासाठी दोन ते तीन वर्षाचा पाठपुरावा व न्यायालयीन प्रक्रिया चा सामना करावा लागला. पण सकारात्मक समय सुचकता असणारे विधीतज्ञ नेमणे गरजेचे असते या सर्वत्र घटनेमुळे न्याय विभागात विधी तज्ञ तसेच महाराष्ट्रातील सर्व लायसन्स धारकांमध्ये ऑडव्होकेट श्री. विनायक साळोखे यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. तसेच सर्व सहकारी ऑडव्होकेट ऋषिकेश मुंदर्गी, श्री. रोहन धवड, श्रीमती प्रवदा राऊत, मेघा जानी आणि ण श्रीमती संपदा खानोलकर याधचकाकत्याांसाठी मोलाचा वाटा उचलला.

दारूबंदी खात्याला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड सध्याचे दारूबंदी खात्याचे मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे लागलेली कीड दूर करू शकतील का? हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका व काही भ्रष्ट अधिकारी सद्यस्थितीमध्ये करत असलेल्या चुका यामुळे महाराष्ट्र दारूबंदी विभागाचे नाव राज्यात सर्व सामान्य जनतेमध्ये खराब होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या दारूबंदी मंत्री म्हणजे अजित दादा यांचीही प्रतिमा डासाळत आहे. त्यामुळे अजित दादा यात तात्काळ लक्ष घालतील का? यावर जनतेने लक्ष लागले आहे.

सध्या महाराष्ट्र मध्ये मागील काही दिवसापासून दारूबंदी एक्साईज विभागाचे वादग्रस्त अधिकारी प्रकरणे खूप गाजत आहे अनेक लोकप्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र दारूबंदी विभागावर भ्रष्टाचाराचे पुरावे देत शिंतोडे उडवले आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, पुणे येथील माजी आमदार रवींद्र धंगेकर तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी दारूबंदी खात्या विरुद्ध संशय व्यक्त केला आहे या सर्व आरोपांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कसे उत्तर देतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Share.