दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या आयएएस कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून या आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कोचिंग सेंटरच्या तळघरात कोणत्याही परवानगीशिवाय लायब्ररी सुरु करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. या घटनेवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत अशा संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमावून चुकवावी लागत असल्याचं एक्स (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत…
Author: admin
भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.