दिनांक –१२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांना देण्यात आलं. मात्र लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर या दोन्ही पक्षांना धक्का बसला आणि शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या पक्षांनी दमदार कामगिरी केली. या कामगिरीचा परिणाम आता लोकसभेत पाहायला मिळत असून लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचं वाटप करताना शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा केला आहे
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने आठ जागांवर विजय मिळवला, तर अजित पवारांच्या पक्षाला अवघ्या एका जागेवर यश मिळालं. नुकतंच लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप करण्यात आले. हे वाटप खासदारांच्या संख्येच्या आधारे करण्यात आल्याने शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा करण्यात आला, तर अजित पवार यांच्या पक्षाला कार्यालयही मिळू शकलं नाही.
Breaking
- भिवंडीतील अवैध ‘धनलक्ष्मी डाईंग’ विरोधात ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’ची धडक; मुख्य संपादक अनिल महाजन यांच्या पुढाकाराने पर्यावरण मंत्री व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा कडे तक्रार दाखल.
- भिवंडीतील नदी-नाल्यांमध्ये विषारी केमिकलची अवैध विल्हेवाट; स्थानिक नागरिकाचे आरोग्य धोक्यात टँकरधारकांवर कठोर कारवाईची मागणी.
- विरार शहरात केमिकल युक्त ताडीची विक्री मोठ्या प्रमाणात स्थानिक उत्पादन शुल्क (एक्साईज) अधिकारी कुंभकरणाच्या झोपेत .
- पर्यावरण रक्षणासाठी ‘ग्रीन इंडिया पॉल्युशन कंट्रोल फाउंडेशन’ सज्ज; नियम पाळणाऱ्यांना पाठबळ, प्रदूषणावर राहणार करडी नजर
- उल्हासनगर कॅम्प नंबर ०४ संतोषनगर येथे महिला आरोग्य जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
- उल्हासनगरमध्ये मुदत संपण्यास अवघा एक महिना शिल्लक असलेल्या लहान मुलांच्या औषधांचे आशा सेविकांमार्फत वितरण; नागरिकांकडून चौकशीची मागणी
- प्रधानमंत्री आवास योजनेबाबत संतोष नगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता; विठाई प्रतिष्ठानच्या बैठकीत नगरसेवकांचे आश्वासन
- सातार्डेत एकाच रात्री तीन घरफोड्या; पोलीस गस्त कुठे? चोरट्यांचा धुमाकूळ, ग्रामस्थांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

